टीईटी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे वतीने नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे टीईटी प्रमाणपत्र जिल्हा परिषदेतून वितरित करण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.
या परीक्षेतील पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन चा निकाल 23 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परीक्षार्थींची प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात उपलब्ध झाली असून हे प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांनी आपले शैक्षणिक व्यावसायिक आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र आदी मुळे कागदपत्र छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे--
1)महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र
2)महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
3) डीटीएड गुणपत्रिका उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बीएड उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
4)आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
5)दिवंगत्वाचे प्रमाणपत्र
6)माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा
7)ओळखपत्र--
आधार कार्ड,पॅन कार्ड,वाहन परवाना,निवडणूक ओळखपत्र
No comments:
Post a Comment