Saturday, 22 April 2023

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा;राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू

पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू

यंदापासून पदवीच्या बीए बीकॉम बीएससी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षासाठी राबवण्याची निश्चित करण्यात आले आहे.
त्यामध्ये चौथे वर्ष 2026-27 पासून लागू होणार आहे.
नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने काही निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांनाच चौथे वर्ष सुरू करण्याची परवानगी असेल. राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार केली जात आहे या पार्श्वभूमीवर चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे केवळ तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालवणारे आणि पीजी विभाग किंवा संशोधन केंद्र नसलेल्या महाविद्यालयांना चार वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
यासोबत निकष पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी पूर्व पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षासाठी निकष पूर्ण केलेल्या अन्य महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल तर या पदवीच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरानंतर क्रेडिट्सचे तपशील द्यावे लागणार आहेत.
विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर तीन वर्ष अभ्यासक्रमात पुन्हा प्रवेश करू शकतात परंतु त्यांनी संपूर्ण अभ्यासक्रम सात वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.
🟣सर्व विद्यापीठांमध्ये धोरण------
राबवण्यासाठी कक्ष राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये येथे 30 एप्रिल पर्यंत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कक्ष नेमण्याच्या सूचना देण्यात आले आहेत
 विद्यापीठांमध्ये हे कक्ष कुलगुरू आणि महाविद्यालयांमध्येही प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली असेल असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.
लोकमत

No comments:

Post a Comment