Saturday, 22 April 2023

बहिर्जी नाईक यांना गुप्त माहिती कळाली तर ती माहिती छत्रपतींना किती वेळात पोहचत होती?

बहिर्जी नाईक यांना गुप्त माहिती कळाली तर ती माहिती छत्रपतींना किती वेळात पोहचत होती?


मी वाचल्या प्रमाणे बहिर्जी यांचे 100 शिलेदार होते त्यात बहिर्जी सेनापती किंवा प्रमुख होते,या प्रमाणे प्रत्येक शिलेदारास अनुक्रमे१, २, ३, ४, असे १०० पर्यंत क्रमांक होते. गुप्तहेर खात्याचा असा नियम होता की एखादी माहिती एखाद्या शिलेदारास मिळाली तर ती माहिती पुढच्या शिलेदारास मिळत असे असे करून जो शेवटचा शिलेदार राजे जवळ असायचा किंवा गडावर असेल तो ती माहिती राजना द्यायचा म्हणजे जर ३४ व्या क्रमांकाच्या शिलेदारास माहिती मिळाली आणि राजेकडे जर ७० व्या क्रमांकाचा शिलेदार असेल तर ती माहिती ३४,३५,३६…… ७० अश्या प्रकारे पोहचत असे पण ती माहिती ३३ व्या शिलेदारास कधीच कळत नसे,अश्या प्रकारे माहिती खूप कमी वेळात राजेंकडे पोहचत असे बहिर्जी राज्यात असो किंवा नसो पण राजेना माहिती नेहमी मिळत असे.
आग्रा प्रसंगात हीच घटना घडली आहे आग्र्यात कैद असताना महाराज काय करायचे काय नाही याची माहिती रायगड वर मा साहेब जिजाऊ यांना हे शिलेदार पुरवत आणि तिथून निघणारी रणनीती तशीच उलट फिरून राजेकडे येत असे.

No comments:

Post a Comment