Thursday, 13 April 2023

अखेर संप काळातील रजा अर्जित रजेत धरणार..शासनाचा GR निघाला....

राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत_____________

राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या
  दिनांक 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी अधिकारी कार्यालयात अनुपस्थितीत होते.
त्यांचे अनुपस्थिती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक 28 मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात आली होती.
 या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीची कालावधी असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत पुकार्य संपामध्ये जे शासकीय कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.
त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून पुर्वीदाहरण होणार नाही.या अटीवर असाधारण रजा ऐवजी आर्जित रजा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
💥💥💥💥💥💥
सदर शासन निर्णय त्याचा संकेतांक क्रमांक 202304131612516907 असा आहे.

हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment