Tuesday, 11 April 2023

अभियोग्यता चाचणीच्या निकालाच्या विरोधात,उच्च न्यायालयात याचिका दाखल

शिक्षक भरतीसाठी राज्यपरीक्षा परिषदेने घेतलेला अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या निकाला विरोधात उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य शासनाला लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.
राज्यात तीस हजार जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पवित्र संकेतस्थळा मार्फत होणाऱ्या भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएस या संस्थेमार्फत 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली.
राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आला.
मात्र परीक्षेची काठीण्या पातळी जास्त असण्यासह निकालाबाबत उमेदवारांकडून आक्षेप घेण्यात आला.
 व नाराज ही व्यक्त करण्यात आली या पार्श्वभूमीवर गेली चार वर्ष शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या
अजय कोळेकर आणि सोपान दारवंटे या उमेदवारांनी या निकाला विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली याची की करते दारवंटे म्हणाले की अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी देण्यासाठी शिक्षक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचा नियम आहे.
 मात्र परीक्षा परिषदेने ही टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अभियोग्यता चाचणीची संधी दिली.
तसेच टीईटी घोटाळा सहभागी उमेदवारांना परीक्षा देण्यास प्रतिबंधित केलेले असूनही काही उमेदवारांना परीक्षा दिली अपंग उमेदवारांनी बँकिंग परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मदतनीस म्हणून घेतले निकालात नॉर्मलायझेशन झाले की नाही याबाबत संदिग्धता आहे .या मुद्द्यावरून याचिका दाखल करण्यात आली आहे.
सोमवारी या याचिकेबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य शासनाला आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे.

No comments:

Post a Comment