आपण कायम ऐकतच आलेलो आहे की मोबाईल रेडिएशन सोडतात आणि हे रेडिएशन पक्ष्यांसाठी व मानवासाठी हानीकारक आहे तर मोबाईल फोन केला नेमकं काय होतं हे जाणून घेऊया .
मोबाईल मध्ये तीन मुख्य तंत्रज्ञानाचा उपयोग करून आवाज पाठवला जातो व आवाज स्वीकारला जातो जे आहेत -
ट्रान्समीटर - सिग्नल पाठवण्या साठी उपयुक्त
रिसिवर - सिग्नल स्वीकारण्यासाठी उपयुक्त
कन्वर्टर - सिग्नल ची स्थिती बदलण्यासाठी उपयुक्त
आपण जेव्हा कोणालाही कॉल करतो तेव्हा मायक्रोफोन द्वारे आपल्या आवाजाचे रूपांतर विद्युत तरंगा मध्ये केले जाते व हे विद्युत तरंग सेल्युलर टावर कडे पाठवले जाते.
टावर मध्ये विद्युत तरंगांचे रूपांतर लाईट पल्स मध्ये केले जाते व ते लाईट पल्स बेस ट्रान्समीटर ( टॉवर शेजारी उपस्थित बॉक्स रुपी रचना ) कडे पाठवले जातात. बेस्ट ट्रान्समीटर कडून light पल्स मोबाईल स्विचींग सेंटर कडे पाठवले जातात.
प्रत्येक क्षेत्रासाठी मोबाईल स्विचींग सेंटर निर्धारित केलेले असतात त्यानुसार तुम्ही पाठवलेला सिग्नल तुमच्या मोबाइल स्विचींग सेंटर कडून तुम्ही कॉल केलेल्या व्यक्तीच्या मोबाईल स्विचींग सेंटर कडे पाठवला जातो व दोन मोबाईल स्विचिंग सेंटर दरम्यान ऑप्टिकल केबलचा वापर केलेला असतो.
आता तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्याच्या मोबाईल स्विचींग सेंटर कडे आपण पाठवलेला सिग्नल पोहचला आहे तर तो सिग्नल त्यानंतर तुमचा कॉल केलेला व्यक्ती जिथे राहत असतो त्या टॉवरकडे पाठवला जाईल व टावर कडून मोबाईल वर सिग्नल पाठवले जातील.
मोबाईलचा रिसीवर रेडीओ तरंगाच्या माध्यमातून ते सिग्नल घेईल व स्पीकर च्या माध्यमातून त्याला आपला आवाज ऐकू जाईल.
आता आपल्या मनात प्रश्न पडला असेल की मोबाईल स्विचींग सेंटरला काय माहित आपण कुठे राहतो? याचे उत्तर आहे जेव्हा आपण सिमकार्ड खरेदी करतो तेव्हा आपण राहत असलेल्या सर्व पत्त्याची माहिती आपण देत असतो व ती माहिती मोबाइल स्विचिंग सेंटर मध्ये पाठवलेली असते व त्यानुसार आपल्याला मोबाईल स्विचींग सेंटर निर्धारित केले जातात.
जर आपण आपल्या घरापासून दूर गेलेले असाल तर तुमच्या वर्तमान लोकेशन नुसार तुम्हाला मोबाइल स्विचींग सेंटर दिले जाते व त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या सिम कार्ड लोकेशन चा उपयोग घेतला जातो. व याच तंत्रज्ञानाच्या उपयोगाने पोलीस गुन्हेगारांना पकडू शकतात.
………
No comments:
Post a Comment