Tuesday, 25 April 2023

पाणी उकळून घेतल्यावर त्यातील किटाणू मरतात.पण त्यांचे अवशेष मृत स्वरूपात पाण्यातच असतात.त्याचा काही अपाय होतो का?

पाणी उकळून घेतल्यावर त्यातील किटाणू मरतात. पण त्यांचे अवशेष मृत स्वरूपात पाण्यातच असतात.त्याचा काही अपाय होतो का?


होय, किटाणूची डेड बॉडी पाण्यातच असते, पण त्याने अपाय तर होत नाही झाला तर फायदाच होतो.

असा मेलेला किटाणू आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. किटाणू वर ठराविक अँटीजन अथवा प्रथिने असतात, ती आपापल्या शरीरास अँटीबॉडी अथवा प्रतिपिंडे तयार करण्यास मदत करतात. ह्या प्रथिनांमुळेच आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती उद्यपित होते व काम सुरू करते. एक प्रकारे मेलेली, मारलेली लसच म्हणा.
लस म्हणजे वेगळे काही नसते. बऱ्याच वेळा लशीमध्ये कमकुवत, अर्धमेले, मेलेले जिवाणू, विषाणूच टोचले जातात. जे शरीरास अपाय न करता फायदा करतात. कमकुवत जिवाणू म्हणजे बुजगावणे- आजारी करत नाहीत, पण आपले शरीर सजग होते, थोड्यात मॉक ड्रिल. आपण त्याने सज्ज होतो.

शरीररातील एक एक क्रिया समजायला शास्त्रज्ञांना अनेक वर्षे लागतात. एखादी पेशी, जिवाणू स्वतःचा आहे की बाहेरील हे सुद्धा आपले शरीर ओळखू शकते. जिवाणूंच्या पेशींवर असलेला प्रथिनांचा क्रम, मुकुट वेगळा/ अनोळखी असेल तर तो परकीय- त्यावर हल्ला होतो. अशा जिवाणूला जणू 'मार्क' केले जाते व तो टी सेल, बी सेल, एन के सेल, मॅक्रो फेज व इतर बाकी भक्षक पेशींचे सावज ठरतो.

काही किटाणू बाबत प्रतिकार शक्ती ही जन्मतः येते तर काही विरुद्ध जन्मानंतर विकसित होते. काही संसर्गजन्य आजार एकदाच होतात कारण आपले शरीर यांची मेमरी ठेवते. थोडक्यात एकाच दगडाला दोनदा ठेच खात नाही. दुसऱ्या वेळेस किटाणू आल्यास आपलाही प्रतिपिंडे लढाईला तयारच असआंतरजा की अन्य प्रकारे. जीवाणू शरीरात कोठून प्रवेश करतो, त्यावर इंम्युन रिस्पॉन्स ठरतो. पण अगोदरच मृत असेल तर जास्त चांगले!!!!!!

No comments:

Post a Comment