Sunday, 9 April 2023

लाजळूच्या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात.

लाजाळू' (लाजणारे) [ संस्कृत नाव - नमस्कारी,लॅटिन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशी होतात. ही मुळात दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ (petioles) काटेरी असतात.

ही वनस्पती खालील नावांनीही ओळखली जाते.

  • संवेदनशील झाड[४]
  • नम्र झाड[४]
  • लाजणारे झाड[४]
  • लाजरी
  • Sensitive plant
  • Humble plant
  • लाजवंती, लज्जिका
  • संकोचिनी
  • झोपणारे गवत
  • आकसणारे झाड
  • सभ्य झाड
  • स्पर्श-करू-नका(Touch-me-not) [४].
  • छुई-मुई/लाजवंती (उर्दू/हिंदी)

वनस्पतीला आपण स्पर्श करताच कोमीजतो म्हणजेच लाजल्या सारखा आपले पाने मिटवून घेतो. व थोड्या वेळाने परत आपल्या पहिल्या स्थितीत येतो. @ शास्त्रीय कारण

याच्या पानात टर्गर द्रव असतो. टर्गर दाबामुळे लाजाळूचे पाने ताट असतात. आणि जेव्हा त्याला आपला किव्हा इतर कुठल्या वस्तूचा स्पर्श होतो. तेव्हा यातील टर्गर चा दाब कमी होतो, व त्यातील पानातील द्रव खाली जातो. त्यामुळे ती वनस्पती कोमीजते. जणू काही ती लाजत असल्याप्रमाणे आपल्याला भासते.

No comments:

Post a Comment