Thursday, 20 April 2023

यंदा दप्तर 75% टक्के होणार हलके;आता शाळेत न्या एकच पुस्तक

यंदा दप्तर 75% टक्के होणार हलके-----

पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू
आता शाळेत न्या एकच पुस्तक
पाठीवर दप्तराचे ओझे वाहून थकलेल्या बच्चे कंपनीसाठी खुशखबर आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्यांचे दप्तराचे वजन 75 टक्के होऊन अधिक हलके होणार आहे.
कारण यापूर्वी केवळ पहिली वर्षासाठी लागू केलेली एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना आता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी लागू होणार आहे.
त्यामुळे सर्व जिल्हास्तरावरून यंदा दरवर्षीपेक्षा 25% पुस्तक संचाची मागणी बालभारतीने नोंदवली घेतली असून छपाई चे कामही सुरू करण्यात आले आहे.
उर्वरित महाराष्ट्र तील शाळा 15 तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू करण्याचे सूचना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्र च्या तयारीसाठी शिक्षण विभागातील यंत्रणा कामाला लागली आहे.
पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही समग्र शिक्षा अभियानातून मोफत पाठ्यपुस्तके वितरणासाठी तयारी सुरू केली आहे त्यासाठी सर्वच जिल्ह्यातून पुस्तकांची मागणी नोंदवून छपाई सुरू करण्यात आली आहे.


🟣आधीच झाली सुरुवात----

1) वास्तविक बालभारतीने 2020 पासूनचे दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे काम हाती घेतलेल्या मात्र पहिल्या वर्षी केवळ राज्यातील 50 तालुक्यांमध्ये पहिल्या वर्गासाठी ही पुस्तके देण्यात आली.

2) आता 2023-24 च्या शैक्षणिक क्षेत्रापासून पहिली ते आठवीच्या वर्गासाठी व संपूर्ण राज्यातील शाळांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके वापरली जाणार आहेत त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे हलके होणार आहे..
🟣असे असेल वर्गनिहाय एकात्मिक पुस्तक---

🟣वर्ग व एकाच पुस्तकात समाविष्ट विषय----

1) पहिली व दुसरी- मराठी,इंग्रजी,गणित,खेळ करू शिकू
2) तिसरी व चौथी- मराठी,इंग्रजी,गणित,परिसर अभ्यास
3) पाचवी-मराठी,इंग्रजी,गणित परिसर अभ्यास
4)सहावी व सातवी-मराठी,इंग्रजी गणित,सामान्य विज्ञान,इतिहास नागरीक शास्त्र
5)आठवी-मराठी,इंग्रजी,गणित सामान्य विज्ञान,इतिहास,नागरीक शास्त्र व भूगोल

No comments:

Post a Comment