🟣सुकाणू समितीच्या अहवालावर उच्च शिक्षण मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचे विचार मंथन----
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करायची यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सुकाणू समिती आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोणावळा येथे दोन दिवस विचार मंथन केले.येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठीची कार्यवाही आणि धोरणात्मक निर्णयावर चर्चा करण्यात आली एनईपी अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीने दिलेला अंतरिम अहवाल स्वीकारला उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने 19 आणि 20 एप्रिल रोजी चर्चासत्र घेतले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुखानू समितीशी संवाद साधला प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी सुकानो समितीचे अध्यक्ष नितीन करमळकर यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
🟣उद्योग क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग----
उच्च शिक्षण क्षेत्रात गुणात्मक विकास उद्योग जगताशी समन्वय बहुशाकीय शिक्षण पद्धतीचा अंगी करण्यासाठी कला शिक्षणाची सुविधा इतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
शिक्षण क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर माध्यम क्षेत्राचा सहभाग यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची रचना होण्यासाठी व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील तज्ञांची ही यात सहभाग घेतला होता.
🟣विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन विद्यापीठ व महाविद्यालयीन मेजर मायनर व जेनेरिक विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम रचना अकॅडमी बँक क्रेडिटची नोंदणी प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप तयार करून अंमलबजावणी करावी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपद्धतीचे अचूक नियोजन करावे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
No comments:
Post a Comment