Saturday, 22 April 2023

चिमुकल्यांना घरपोच मिळणार प्रगती पुस्तक;प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना आदेश------

💥👆चिमुकल्यांना घरपोच मिळणार प्रगती पुस्तक प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना आदेश------

सोलापूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.दररोज जिल्ह्याचे तापमान सरासरी 40 अंश सेल्सिअस पर्यंत आहे.
दरवर्षी 1 मे रोजी शाळांचे निकाल प्रसिद्ध होतात.त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना शाळांमध्ये बोलावून त्यांची प्रगती पुस्तके दिली जातात.पण खारघर घटनेनंतर आरोप आरोग्य विभागासह शालेय शिक्षण विभागाने शाळांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येक शाळांमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रगती पुस्तक पोहोच करतील असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे 
या पार्श्वभूमीवर 1 मे ऐवजी आता 29 एप्रिल पर्यंत किंवा एक मे नंतर उन्हाळा सुट्टी त्यांच्या सोयीने प्रगती पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोच करतील.
 सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2795 शाळा आहेत त्या अंतर्गत 2 लाख 10 हजार विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच घरपोच प्रगती पुस्तके मिळणार आहेत.
 दरम्यान उष्माघातीमुळे 12 जून ऐवजी 15 जून पासून शाळा सुरू होणार आहे दरम्यान पहिली ते पाचवीसाठी 200 दिवस तर 6-8 साठी 220 दिवस अध्यापन होईल यादृष्टीने पुढे शिक्षणाधिकारी नियोजन करावे असे शालेय शिक्षण विभागाने आदेशातून स्पष्ट केले आहे.
कडकउन्हा मुळे उष्माघाताची भीती वर्तन आली असून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे निकाल 29 एप्रिल किंवा उन्हाळा सुट्टीत जाहीर केला जाणार आहे निकालानंतर प्रगती पुस्तके घ्यायला विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगती पुस्तक मिळणार आहेत.

जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्माघाताची भीती आहे त्यामुळे प्रत्येक शाळांमधील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तके त्यांच्या घरी किंवा पालकांना द्यावी तशी सूचना मुख्याध्यापकांना दिले आहेत.
 प्रगती पुस्तके देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणीही शाळेत बोलावू नये.
 संजय जावीर 
प्राथमिक शिक्षणाधिकारी
 सोलापूर जिल्हा परिषद

No comments:

Post a Comment