तिखट अन्नपदार्थ खाताना घाम का येताे?
तिखट पदार्थ खाताना घाम येताे.घामाचा संबंध जर तापमानाशी असेल,
तर तिखट खाताना घाम का यावा?
आपल्या मेंदूत उत्तेजनांचे केंद्र आहे.
भीती, संकट, शरीराच्या एखाद्या भागाला झालेली इजा इत्यादी कारणांमुळे अत्यंत प्रखर संवेदना मेंदूच्या या केंद्रास जागृत करतात.
मेंदूतील उत्तेजना केंद्र जागृत झाले की शरीर विविध प्रकारे प्रतिसाद देते.
समजा पंधरा प्रकारचे आवेग या केंद्राकडे संवेदना आणू शकतात
आणि हे केंद्र त्या-त्या संवेदनेनुसार पंधरा प्रकारचे आदेश देऊ शकते.
पण या उत्तेजना केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा या केंद्रास संदेश मिळला की,
कुठल्याही प्रकारची संवेदना या केंद्राला मिळाली की, ते उत्तेजित हाेऊन ठरावीक आदेश पाठवते.
‘उत्तेजना केंद्र’ हे मुख्यतः शरीर रक्षण यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
‘उत्तेजना केंद्र’ हे मुख्यतः शरीर रक्षण यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
काेणत्याही कारणाने हे केंद्र जागे झाले की,
जे प्रतिसाद दिले जातात,
त्यापैकी ‘घाम’ हा बहुतेक प्रत्येक वेळी दिला जाणारा प्रतिसाद आहे.
असाच दुसरा प्रतिसाद म्हणजे लाळेची निर्मिती.
रडताना म्हणूनच ताेंडात अधिक लाळ निर्माण हाेताे व घाम येताे.
उत्तेजना केंद्राचे हे दाेन्हीही प्रमुख प्रतिसाद आहेत.
आपण तिखट खाताे तेव्हा तिखटाच्या दाहक क्रियेच्या संवेदना मेंदूपर्यंत गेल्याने उत्तेजना केंद्र कार्यान्वित हाेते.
या कारणाने वर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार खूप घाम येताे.
No comments:
Post a Comment