वंचित आणि दुर्लक्षित घटकातील बालकांना अपेक्षित शाळेत शिक्षण घेता यावे या अनुषंगाने आरटीई अंतर्गत त्यांना प्रवेश देण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्ह्यातून हजाराहून अधिक अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते.
प्राप्त अर्जातून निवड प्रक्रिया अंतिम झाली असून प्रवेश बाबत बुधवारी दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी संदेश प्राप्त होणार आहेत.
नोंदणी दरम्यान दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत शिक्षण संचालनालयाकडून संदेश मिळाल्यावर पुढील प्रक्रिया होईल.
शिक्षण विभागाच्या वतीने गेल्या महिन्यात RTE प्रवेश प्रक्रिया संदर्भात ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
त्या अनुषंगाने 25 मार्च पर्यंत जिल्ह्यात अनुदानित-विनाअनुदानित शाळांसाठी हजारो अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते.
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आरक्षित जागा त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने शिक्षण संचालनांकडून नुकतीच ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली असून प्राप्त ठरल्याबाबत संबंधितांना बुधवारी भ्रमणध्वनीवर संदेश प्राप्त होणार आहेत.
यानंतर कागदपत्राची पडताळणी करून संबंधित मुलांना त्यांनी दर्शविलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment