Thursday, 20 April 2023

रात्रीच्या जेवणात भात खाऊ नये असे का म्हणतात?

रात्रीच्या जेवणात भात खाऊ नये असे का म्हणतात?

तांदूळ हे भारतातील मुख्य पिकं आणि अन्नपदार्थ आहे. विशेषत: किनारपट्टीच्या प्रदेशात जिथे लोकं भात भरपूर प्रमाणात पिकवतात आणि ते त्यांच्या मुख्य जेवणासाठी प्रामुख्याने वापरले जाते.

दिवसातून फक्त एकदा नाहीतर काही लोकं रात्रीसुद्धा भात खातात. यामागे हाही विचार असतो की, भात पचायला सोपे आहे आणि भाताशिवाय त्यांचे जेवण अपूर्ण आहे.
कदाचित हे तुमच्यासाठी देखील खरे असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की, रात्री भात खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही असेही म्हटले जाते.
तांदळामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात आणि ते सहज पचतात परंतु समस्या तिथेच आहे.

तांदूळ हा एक असा घटक आहे जो आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीमध्ये त्वरित वाढ करतो कारण ती सहजपणे विघटित होते आणि याचा अर्थ आपल्याला त्वरित उर्जा मिळते.
तांदूळ देखील अशा घटकांपैकी एक आहे.
ज्यामुळे वजन वाढू शकते कारण त्यात कार्बोहायड्रेट्सच्या रूपात जास्त कॅलरीज असतात जर त्या वापरल्या नाहीत तर तुमच्या शरीरात चरबीच्या रूपात साठून राहतात.

त्यामुळे शक्यतो रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळावं किंवा अगदी कमी प्रमाणात खावा, असा सल्ला दिला जातो.

No comments:

Post a Comment