Saturday, 29 April 2023

आरटीई प्रवेशात अशी गंडवागंडवी;शाळांनीच केले स्टिंग ऑपरेशन-----

आरटीई प्रवेशात अशी गंडवागंडवी;शाळांनीच केले स्टिंग ऑपरेशन

आलिशान घर,महागडी गाडी,स्मार्ट फोन,अंगा खांद्यावर खेळणारी सुवर्णाभूषणे असणाऱ्या आर्थिक सक्षम गटात येणाऱ्या पालकांनी चक्क 'आरटीई' अंतर्गत पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करून प्रवेश सुद्धा पोर्टलद्वारे निश्चित झाला आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'आरटीई' अंतर्गत प्रवेशासाठी सुरू असलेल्या या गंडवागंडवीचा पर्दाफाश चक्क खासगी शाळांनी पुराव्यानिशी केला आहे. 
शाळांकडे प्राप्त अर्जातील केवळ वीस टक्केच अर्ज खरे आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे शाळांनी केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांनाही दर्जेदार शाळांमध्ये दुरुपयोग करून आर्थिक सक्षम गट
याचा फायदा घेत असल्याचा आक्षेप खाजगी शाळांनी शासनाच्या स्तरावर यापूर्वी केला होता.
मात्र
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी भूमिका शासनाच्या स्तरावर घेतली जात असल्याने शाळांचे मोठी कुचंबना होते आर टी ई ची प्रस्ताव शासनाने दिला नसल्याचा विचित्र सहा शाळांनी नवीन प्रवेश न देण्याची भूमिका घेतली शासकीय स्तरावर चिरीमिरी देऊन आवश्यक होते
 त्या रकमेच्या उत्पन्नाचा दाखला मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस शासनाने दाखविणे आवश्यक आहे.

🟣 खाजगी शाळांनी असे केल्यास स्टिंग------
शासनाच्या पोर्टलवर शाळांकडे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पालकांनी दिलेल्या पत्त्यावर शाळेतील कर्मचारी पोहोचले त्यांनी पालकांची जीवनशैली आणि राहणीमान यांची छायाचित्रासह माहिती घेतली यातून पुढे आलेली माहिती धक्कादायक आणि शासकीय यंत्रणांना हादरवून सोडणारी अशीच आहे.
🟣तर धनदांडग्याचे बनावट मुखवटे गळतील-----
💥शासनाच्या योजनेचा लाभ गरजवंतांना मिळत नसल्याचे खासगी शाळांनी यापूर्वीही शासनाला सांगितले होते. यावेळी या बाबी पुराव्यासह खासगी शाळांनी स्वतःकडे ठेवल्या आहेत.
💥शंभरात अवघे २०-२५ पात्र उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच गांधारीचे रूप धारण केलेल्या शासनाने आरटीई आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सत्यता तपासून मगच प्रवेश देण्याची भूमिका घेतली असती तर धनदांडग्यांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे मागेच गळून पडून खच्या गरजूला याचा लाभ मिळाला असता.

🟣वकील, शिक्षकांकडून आरटीईचा गैरफायदा------
गरीब, दुर्बल, वंचित घटकांसाठीच असलेल्या आरटीई शिक्षणाचा मोफत अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांमध्ये वकील, शिक्षक, पोलिस, सरकारी कर्मचारी यांच्यासह व्यावसायिकांचाही समावेश आहे. दुमजली घर आणि दारात लाखो रुपयांची गाडी असलेल्यांनी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
🟣चक्क शाळेच्या कंपाऊंडमध्येच निवास!-----
1)💥खासगी शाळांमध्ये अर्ज केलेल्या एका पालकाने शाळेपासून निवासस्थानाचा पत्ता ०.०१ मीटर असा नमूद केला आहे.
2)💥त्यांनी दर्शविलेल्या गुगल मॅपनुसार पाहणी केली तर चक्क शाळेच्या कंपाऊंडमध्येच हे निवासस्थान असल्याचे दर्शवित आहे.

आरटीईची योजना गरजूंसाठी असताना प्रत्यक्षात त्याचा गैरफायदा आर्थिक सक्षम गटाकडून घेतला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ही योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळावा. दुर्बल आणि गरीब वंचित यांचा हक्क फसवून घेणे म्हणजे हा गुन्हाच आहे.
चुकीच्या गोष्टींना आमचा विरोध आहे.
- राजेंद्र चोरगे, राज्य उपाध्यक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क

No comments:

Post a Comment