नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण येत्यावर शैक्षणिक वर्षापासून लागू केले जाईल.
असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले.तसेच अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण या पुढील काळात मराठीत शिकवले जाणार आहे असेही ते म्हणाले.शिक्षण मंत्र्यांनी नवीन शिक्षणाचे स्वरूप आतापर्यंत दहा प्लस दोन असे होते. त्या ऐवजी पाच प्लस तीन,तीन प्लस चार अशी व्यवस्था लागू होईल असे सांगितले.
🟣सेमिस्टर पॅटर्न वर भर-------
नव्या पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे.
सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंत शिक्षण 8 सेमिस्टर मध्ये विभागण्यात आले आहे.
तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचीही विचार आहे.असेही केसरकर यांनी नमूद केले.
🟣नव्या शैक्षणिक धोरणानुसार असे असतील टप्पे-------
1) पहिला टप्पा म्हणजे पहिली ते पाच वर्ष-पूर्व प्राथमिकची तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
2) दुसरा टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष-इयत्ता तिसरी ते पाचवी
3) तिसरा टप्पा म्हणजे त्यानंतरची तीन वर्षे-इयत्ता सहावी ते आठवी
4) चौथा टप्पा म्हणजे उर्वरित चार वर्ष-इयत्ता नववी ते बारावी
🟣नव्या धोरणातील वैशिष्ट्ये---
1) पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत
2) पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जा करण्याचा प्रयत्न
3) सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
4) विद्यार्थी स्वतःचे,सह विद्यार्थी शिक्षकांचे मूल्यमापन करतील
5) सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता
6) विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यावर भर
7) शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही बदलणार
No comments:
Post a Comment