फुलपाखरू
हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे.कीटकांना डोके,पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात.
फुलपाखरांचे जीवनचक्र
फुलपाखरांचे आयुष्य हे १४ दिवसांच असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य १४ दिवस असू शकते.
फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोष व फुलपाखरू या अवस्था असतात.
अंडे/ अंडी - विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष्य होऊ नयेत. यांचा रंग पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो.
अळी किंवा सुरवंट-अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा, कोवळ्याड्याचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो. परंतु सगळे सुरवंट शाकाहारी नसतात. काही मावा किडीवर तर काही मुंग्यांचे लार्व्हा खातात.ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते. सुरवंटाचा आकार मोठा होतो. या अवस्थेत तो ३ ते ४ वेळा वरचे आवरण काढून टाकतो. यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळतेजुळते असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात.
कोष - अळीची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधते आणि त्या जागी स्थिर होते. कोष करताना ती तिची त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. त्यानंतर अळी स्वतःभोवती कोष तयार करते. काही कोष झाडांवर तर काही जमिनीच्या आत असतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा सहा दिवस ते काही महिने असा असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो.
फुलपाखरू कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते.
फुलपाखरांच्या पंखांमध्ये वेगवेगळे रंग कोठून येतात
रंग लवकांमुळे किंवा विशीष्ट रचनेमुळे अथवा दोघांच्या एकत्रीकरणामुळे बनलेले असतात.
या लवकांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे वेगेवेगळे रंग येतात. दुसरा रंगांचा प्रकार म्हणजे रचनेपासून बनलेले रंग.
हे रंग म्हणजे प्रत्यक्ष रंग नसून ते फुलपाखरांच्या पंखावरील खवल्यांच्या विशीष्ट रचनेमुळे आलेले असतात.
ही रचना प्रकाश परवर्तीत करून रंग दर्शवते.
मात्र याकरता प्रकाश कोणत्या कोनातून परवर्तीत होतोय ह्यावर रंग अवलंबून असतो.
पावसाळ्यात रस्त्यांवर गाडीचे पेट्रोल पडलेले असते, त्यावर जर पाउस पडला तर ते सप्तरंगी चमकते तसेच हे रंग प्रकाश पडला की एकदम झळाळून उठतात.
No comments:
Post a Comment