निकाल नक्की लागणार तरी कधी; नव-नवीन तारखाने पालक वर्ग वैतागले...?
परत आली नवीन तारीख
वार्षिक पेपर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मोठं शिखर.
मार्च महिना आला की सर्व घरातील मोठी माणसं प्रत्येक विद्यार्थ्याला जाता येता एकच सपाटा लावलेला असतो तो म्हणजे अभ्यास कर...अभ्यास कर....
आम्ही विद्यार्थी चढाओढीने अभ्यास करायचं एकदा काय पेपर संपले की मामाचं गाव काय
कैरी काय...
आंबे काय...
मॅच काय...
कॅरम बोर्ड काय...
मजाच मजा
शाळेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक महापूजा संपल्यावर सरांनी सर्वांना मोठ्याने सूचना दिली.
पेपर संपले असून उद्यापासून शाळेला सुट्टी असेल अजून एक सूचना सरांनी दिली ती म्हणजे आपला वार्षिक निकाल एक मे रोजी लागणार आहे. निकालात किती मार्क पडतात?
आणि पहिला कोण येतो याची उत्सुकता तर विद्यार्थ्यांना असणारच..ना..
01 तारीख जवळ येत असताना मोबाईल आणि टीव्हीवर एक बातमी येत होती.
आता गावाला कसं जायचं?
तसं तर दरवर्षी निकालाची तारीख आतापर्यंत 01 मे ही एकच असायची.
पण शाळेकडून,शिक्षण विभागांकडून सारखी नव-नवीन तारीख मिळू लागली आहे.
त्यात आता सकाळी समजले की निकाल आता 06 मे ला लागणार असून असा फतवा शिक्षण संचालकाकडून निघत आहे.
विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत नवीन नवीन तारखा मुळे
विद्यार्थी पालक आणि शिक्षक ही चांगलेच वैतागले आहेत.
सध्या महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेची परीक्षा संपली असून निकाल कधी लागेल याची वाट पाहत असताना शिक्षण विभागामार्फत 20 एप्रिल 2023 रोजी नवीन अध्यादेश आला.
की 29 एप्रिल 2023 रोजी सर्व शाळेचा निकाल जाहीर होणार
अथवा सुट्टीच्या कालावधीत जाहीर करा
अशी सूचना दिल्या.
स्थानिक परिस्थिती व कडक उन्हाचा विचार करून निकाल घरपोच करण्याची जबाबदारी संबंधित शाळा,शिक्षक व प्रशासनावर सोपवली
आणि 2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळा सुट्टी जाहीर केली.
व नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2023 पासून सुरू होणार
निकाल जरी 29 तारखेला असला तरी शिक्षकांना 5 मे पर्यंत शाळेत येण्याचे बंधन होते
06 मे पासून सर्व शिक्षकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या
असे असताना
प्राथमिक शिक्षण संचालकांनी पुन्हा एकदा 28 एप्रिल 2023 रोजी 2 रा अध्यादेश काढून राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर 06 मे 2023 रोजी शाळेचा निकाल जाहीर करण्याचा फतवा काढला आहे.
यामुळे शिक्षक पालकांसमोर तोंडघशी पडली आहे.
या रोजच्या निर्णयाच्या निर्णयाने पालक,शिक्षक आणि विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत.
01 तारखेच्या निकालावर सर्व गोष्टींचे नियोजन होत असते.
निकाल न घेता गावी जाणे म्हणजे विद्यार्थ्यांना नाराज करणे...
असे होईल.
या सर्व गोष्टींवर पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शेवटी शिक्षकांना पण वरिष्ठांचे ऐकावेच लागणार...
आणि पालकांना शिक्षकांची सुद्धा.....
असो निकाल चांगलाच लागणार सुट्टीही चांगलीच जाणार
सुट्टीचे काय एक दिवस मागेपुढे होईल
पण विद्यार्थ्यांना थोर व्यक्तीमत्व आणि समाजासाठी आयुष्य वेचणारे
समाज सुधारक यांची माहिती
असणे पण तितकेच महत्त्वाचे आहे....
No comments:
Post a Comment