महाराष्ट्र भूषण पुरस्कार
हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. १९९५ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
हा पुरस्कार पुढील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो : आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा.
निकष---
सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.
स्वरूप----
जानेवारी, २०२३ च्या निकषानुसार, पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.
सुरुवातीला पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. सप्टेंबर, २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment