Sunday, 16 April 2023

अतिरिक्त च्या भीतीने विद्यार्थ्यांची पळवा पळवी

अतिरिक्त च्या भीतीने विद्यार्थ्यांची पळवा पळवी

विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक वरून 22-23 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता होणार असून त्यावरच अतिरिक्त व वाढीव शिक्षक निश्चित होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांसह राज्यातील 30 लाख विद्यार्थ्यांच्या आधार मध्ये चुका असून 40 लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणच झालेले नाही.
त्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत आहे संच मान्यतेपूर्वी आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होऊ नये किंवा शिक्षक वाढावेत म्हणून अक्षरशः विद्यार्थ्यांची पळवा पळवून सुरू झालेली आहे.
आधार कार्ड मधील त्रुटींची दुरुस्ती करताना काही शाळा ऑनलाइन सरल पोर्टलवरील मुलांची संपर्क करत आहेत त्या विद्यार्थ्यांचे आधारमधील दुरुस्ती करून तो मुलगा आमच्याच शाळेत असल्याचे दाखवू लागले. आहेत ज्या शाळेत तो मुलगा शिकतोय त्या मुख्याध्यापकाने ऑनलाइन रिक्वेस्ट पाठवूनही समोरील शाळा दाद देत नाहीत साठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक आणि पुढे तीन-चार मुले जरी वाढली तरी एक शिक्षक वाढीव मिळतो त्यासाठी काही शाळांचा अट्टाहास सुरू असल्याची वस्तू स्थिती आहे काही शाळांनी आपल्यासंबंधीतील शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून आपल्याकडील विद्यार्थी त्यांना देत आहेत.विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांमध्ये शाब्दिक चकमकी देखील होत आहेत.दरम्यान राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये जवळपास 29000 तर खाजगी अनुदानित शाळांमध्ये 32 हजारांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत पुढच्या महिन्यात 30 ते 32 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तत्पूर्वी प्रत्येक शाळांमधील आधार पटसंख्या निश्चित होऊन संच मान्यता होईल आणि त्यानुसार शाळांमध्ये रिक्त जागांबद्दल वस्तुस्थिती समोर येणार आहे.
🟣राज्यांमधील शाळांची सद्यस्थिती पहिली ते बारावी-----
1)एकूण शाळा-1 लाख 9 हजार
2)शाळांमधील पटसंख्या 2.13 कोटी
3)एकूण शिल्लक 7.9 लाख
4)आधार मधील प्रमाणीकरण नाही 40.3 लाख
शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने कोणत्याही विद्यार्थ्यांची प्रवेश शाळाने अडवणे असे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत पण त्या विद्यार्थ्यानेच खाजगी शाळेची फी भरली नसल्याने संबंधित शाळा दाखला देत नाही दुसरीकडे त्या विद्यार्थ्यांची सरळ पोर्टलवर नोंद पूर्वीच्या शाळेत आहे त्यामुळे दाखला नसता नाही त्या मुलाला प्रवेश द्यायचा कसा असा पेच मुख्याध्यापकांकडे उभा आहे.
शाळांची संचमान्यता आता आधार बेसड होणार आहे. त्यामुळे पटसंखेतील बनावट गिरी समोरील तथा बनावटगिरी संपेल 30 एप्रिल पर्यंत सर्व शाळांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व आधार कार्ड वरील चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे अपेक्षित आहे.स्टुडन्ट व आधार पोर्टल वरील माहिती सारखी असणे अपेक्षित आहे.

 शरद गोसावी 
(संचालक शालेय शिक्षण विभाग पुणे)

No comments:

Post a Comment