Thursday, 20 April 2023

विविध पक्षी आकाशात थव्यात उडताना एकमेकांना न धडकता कसे काय उडतात?

विविध पक्षी आकाशात थव्यात उडताना एकमेकांना न धडकता कसे काय उडतात?


एकदम अस्ताव्यस्त थव्याने जर पक्षी उडू लागले तर एकमेकाचे पंख घासुन गतिमध्ये अनियमित पणा येवुन त्यांच्या प्रवासात अडथळा येवु शकतो.
शिवाय पंखाच्या फडफडण्याने एअर टर्ब्युलन्स तयार होवुन उडणे अशक्य होवू शकते ते वेगळेच.
त्यामुळेच पाणपक्षी उडताना इंग्रजी व्ही अशा रचनेत एकापाठोपाठ एक अशा पध्दतीने उडतात.
त्यामुळे अनावश्यक टर्ब्युलन्स तयार होत नाहीत.
परंतु नियमाला अपवाद हे असतातच.
आफ्रिकन देशातून आपल्याकडे नियमित स्थलांतर करणारे स्टर्लिग पक्षी हजारोच्या संख्येत असतात.
त्यांना एका विशिष्ट आकारात खुप मोठी रांग करणे परवडत नाही.
कारण त्या फॉर्मेशन मुळे शिकारी पक्षी त्यांची सहज शिकार करु शकतो. त्यामुळे ते एका प्रचंड आकाराच्या चेंडू सारख्या थव्याने उडतात.
आपली गति कायम ठेवून ते आपल्या थव्याच्या परीघातच उडतात.आपण लष्करी कवायतीत जवान आपली मोटारसायकल दुसर्‍या दिशेने येणार्या जवानाच्या मोटारसायकलीला न धडकता व वेग कमी न करता कशी पुढे नेतात हे आपण पाहीले असेलच.
त्याच धर्तीवर आपले पक्षी थव्याने उडतात.

No comments:

Post a Comment