सतत जांभया येतात ? नका करू दुर्लक्ष, या आजारांचा असू शकतो संकेत
जांभई येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. जांभई घेताना आपण तोंड उघडतो आणि दीर्घ श्वास घेतो. जांभई अनेकदा थकवा किंवा झोपेशी संबंधित असते. जांभई येण्याची अनेक कारणे असू शकतात.
अनेकदा खूप थकल्यावर किंवा झोप आल्यावर आपण जांभई (yawning) देतो. जांभई येणे पूर्णपणे सामान्य आहे आणि प्रत्येक व्यक्ती दिवसातून 5 ते 19 वेळा जांभई देते. मात्र, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 10 पेक्षा जास्त वेळा जांभई देतात. काही अभ्यासानुसार, असे बरेच लोक आहेत जे दिवसातून 100 वेळा जांभई (excessive yawning) देतात. याचे एक सामान्य कारण म्हणजे ठराविक वेळेपूर्वी जागे होणे. काहीवेळा जास्त जांभई येणे हे काही गंभीर आजाराचेही लक्षण (symptoms of health problems) असू शकते. जास्त जांभई येणे किंवा वारंवार जांभई येणे हे काही औषधांचे दुष्परिणाम देखील असू शकतात. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..
ही आहेत जास्त जांभई येण्याची कारणे –
जास्त वेळा जांभई येणे, हे एखादा गंभीर आजार किंवा विकृतीचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, आपण त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. हे एक स्लीप डिसऑर्डरचे लक्षणही असू शकते. उदाहरणार्थ, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया, यामध्ये संबंधित व्यक्तीला दिवसा जास्त झोप येते. जास्त जांभई येणे हे मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचयाशी संबंधित आजारांचेही कारण असू शकते, असेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
1)झोप पूर्ण न होणे
2)मधुमेह
3)स्लीप ॲप्निया
4)नार्कोलेप्सी
5)ह्रदयरोग
6)इन्सोमेनिया
No comments:
Post a Comment