Thursday, 27 April 2023

शाळांमध्ये दिसणार लेट्स चेंज चित्रपट

 शाळांमध्ये दिसणार लेट्स चेंज चित्रपट

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनवर आधारित लेट्स चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमध्ये दाखवण्याची सूचना देण्यात आली आहे.
 मात्र या निर्णयाची सक्ती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हा चित्रपट दाखविताना शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणतेही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानावर लेट्स चेंज हा चित्रपट आधारित आहे.
या चित्रपटात शहरात अस्वच्छता उघडी गटारे त्यातून वाहणारा कचरा शहराचे बकाल स्वरूप दाखवले जाते.
वाहतूक कोंडी,शहरभर मोकाट फिरणारे गुरे,प्लास्टिकचा कचरा खाणाऱ्या गाई,भटके कुत्रे असे शहराचे वास्तव दाखवण्यात आले आहे.
 त्यामुळे काही दिवसापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. तो शाळकरी विद्यार्थ्यांना दाखवण्याची मागणी केली जात होती आखेर ती मान्य करण्यात आली.
इच्छुक विद्यार्थ्यांकडून दहा रुपये शुल्क आकरावे असे आदेश देण्यात आले आहे.
🟣 सक्ती करणार नाही----
राज्य सरकारने हा चित्रपट शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला.शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि 24-25 या दोन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली आहे.
 हा चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला सक्ती करण्यात येणार नाही.
असेही जाहीर करण्यात आले आहे.
 चित्रपट दाखवताना वाद उद्भवल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेला दिलेली परवानगी तात्काळ करण्यात येईल.
हा चित्रपट दाखवण्यासंदर्भात जिल्हा संयोजकांमार्फत शिक्षण विभागाला अहवाल सादर करावा 
अशा सूचना विभागाने दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment