राष्ट्रीय आराखड्याचाच अभ्यासक्रम शिकवा;शाळांना निर्देश देण्याची बाल हक्क संरक्षण आयोगाचे पत्र
राष्ट्रीय अभ्यासक्रमा आराखड्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने विविध केलेला अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रियेचे पालन करण्याची निर्देश सर्व सरकारी व खाजगी शाळांना द्यावेत असेच सांगणारे पत्र राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्व राज्यांना पाठविला आहे.
एनसीईआरटी आणि राज्य शैक्षणिक प्राधिकरणाशी सुसंगत नसलेला स्वतःचा अभ्यासक्रम लागू करण्याचा शिक्षण मंडळाचा कोणताही प्रयत्न शिक्षणाचा हक्क कायद्याचे उल्लंघन आहे असे या पत्रा स्पष्ट करण्यात आले आहे एखादे राज्य मंडळ किंवा शाळा शैक्षणिक प्राधिकरणाने प्राथमिक विभागासाठी विविध केलेल्या पेक्षा वेगळा अभ्यासक्रम मूल्यमापन पद्धती लागू करत असेल तर ते प्रथम दर्शनी आरटीई चे उल्लंघन मानले जाईल ही बाब राज्यातील सर्व शाळा आणि मंडळांना कळवावी.
असे आयोगाचे प्रमुख प्रियंका कानूनगो यांनी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना आणि सचिवांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे.
🟣सीबीएससीच्या प्रणालीवर बोट---
एनसीपीसीआर प्रमुख म्हणाले की सीबीएससीच्या प्रणालीचे पुनरावलोकन केल्यावर असे दिसून आले की प्राथमिक स्तरावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या कल्पनेला मान्यता देताना या बोर्डाने केवळ एनसीईआरटीच्या कार्यक्षेत्रातच पाऊल ठेवले नाही तर सीसीई च्या उद्दिष्टांचा चुकीचा अर्थ लावला आहे. सीसीई सर्व शाळांमध्ये एक समान अभ्यासक्रमाचा पुरस्कार करते.
🟣बालकांची भेदभाव केला जाणार नाही--
शैक्षणिक प्राधिकरणाने विहित व प्रकाशित केलेली पुस्तके वापरल्याबद्दल कोणत्याही बालकाशी भेदभाव केला जाणार नाही तसेच त्याचा मानसिक शारीरिक छळ केला जाणार नाही असे घडल्यास संबंधितांवर बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असेही या पत्रात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment