Saturday, 15 April 2023

का पडतात पाया,जाणून घ्या...या संस्काराबद्दल

का पडतात पाया,जाणून घ्या...........
या संस्काराबद्दल

पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते.
 याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडण्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते.
 
असे म्हणतात की जे फल कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान, दान, पुण्य इत्यादीने प्राप्त होतं तेच पुण्य मोठ्यांच्या पाया पडल्याने होतं.
तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात.
 
वैज्ञानिक कारण: 
पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात.
 त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते. 
हा एकप्रकाराचा व्यायाम आहे. 
खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्त प्रवाह वाढतो जो डोळ्यांसाठी चांगला असतो. 
तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधार्‍या मंडळीबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते.

No comments:

Post a Comment