सरल पोर्टलची गती मंदावली;आधारित दुरुस्ती लटकली
शालेय विद्यार्थ्यांची आधार जोडणी 30 एप्रिल पर्यंत करण्याचे शासनाचे निर्देश आहेत 100% जोडणी झाली तरच संबंधित विद्यार्थ्यांना व शाळांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे परंतु सरळ पोर्टलची गती मंदावल्याने विद्यार्थ्यांच्या आधार दुरुस्तीचे काम लटकले आहे.
सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थी आधार नोंदणी व जोडणे 100% आवश्यक आहे शासनाच्या विविध शैक्षणिक योजना गणवेश व पाठ्यपुस्तके शालेय पोषण आहार आदीसाठी ही नोंदणी अनिवार्य केली आहे.
यातच सरल पोर्टलवर स्टुडंट डाटाबेस भरण्याचे काम सुरू आहे परंतु आजार ची साईट कधी सुरू तर कधी मंद गतीने चालत असल्याने शिक्षक व कर्मचारी त्रस्त झाले आहेत ही साईट दिवसा सुरळीतपणे चालत नसल्याने डाटाबेस भरण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी रात्र-रात्र काढावी लागत आहे रात्री कोचीतच साईट चालते एखाद्या कामासाठी विद्यार्थ्याने बाहेरून माहिती अपलोड केली
तर ते आधार या पोर्टलवर इनव्हॅलिड दाखवले आहे यामुळे शिक्षक कर्मचारी वैतागले आहेत सरल पोर्टल सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी तांत्रिक विभागाकडून प्रयत्न होत असले तरी ती सध्या मात्र संत गतीने चालत आहे.
🟣आधार जोडणी साठी डेडलाईन--
विद्यार्थ्यांची आधार जोडणी 30 एप्रिल पर्यंत करण्याबाबत डेडलाईन दिली आहे ती पूर्ण झाल्याशिवाय संच मान्यता होणार नाही यामुळे अनेक क्षार मधून आधार दुरुस्तीचे काम सुरू असले तरी वेबसाईटची गती मंद असल्याने कामाचा पूरक वेळेत होत नसल्याची स्थिती आहे.
वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक असते ही संच मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.
🟣दुरुस्ती करूनही इन व्हॅलिड---
यातच विद्यार्थ्यांचे नाव जन्मतारीख यात फरक किंवा चूक असल्यास डेमोग्राफिक एरर किंवा इतर त्रुटीचा मेसेज येत असल्याने अडचणी येत आहेत.
प्रवेश झाल्यापासून आधार व इतर माहिती भरली जाते त्याची खात्री करताना नाव आडनावातील एक अक्षराचाही फरक दिसून आल्यास व्हेरिफिकेशन होत नाही यातच दुरुस्ती पूर्ण करूनही त्या आधारच्या वेबसाईटवर गेल्यास तेथे व्यालीड होत नसल्याच्या तक्रारी सुद्धा आहेत.
No comments:
Post a Comment