Wednesday, 19 April 2023

स्क्रीनमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो?डोळ्यांचे कोणते व्यायाम करू शकतो?

आयुष्यभर डोळे निरोगी हवेत तर हे कराच…

मोठ्या प्रमाणात लोक आता स्मार्टफोन, संगणक, टॅब्लेट, लॅपटॉपमध्ये जास्त-जास्त आपला वेळ घालवत असतात. कारण मुळात डिजिटल माध्यमांमुळे लोक अधिक प्रमाणत सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहेत.
 कोरोना काळात लहान मुलांबरोबर मोठ्या मंडळींचा ही स्क्रीनवर काम करण्याच्या वेळेमध्ये अधिक वाढ झाली आहे. तर लहान मूलांना लॅपटॉप, मोबाईल कमी बघा असे सांगणारे पालक मात्र,आता मुलांना मारून मुटकून त्याच संगणकासमोर बसवतात. तर घरातील मोठी मंडळी ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर, फोनच्या स्क्रीनकडे बघत असतात.
 काम झाल्यानंतर कामातून क्षणभर विश्रांती  मिळण्यासाठी टी.व्ही बघतात.थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण एका स्क्रीनमधून डोक काढून दूसऱ्या स्क्रीनमध्ये टाकत असतो. हे केवळ पुरुषांच्याच बाबत होत असत असे नाही. 
तर पुरुष, स्त्रिया या दोघांचाही विविध कारणांनी स्क्रीनवरचा वेळ प्रचंड वाढत चालला आहे. काम आणि मनोरंजन यानिमित्ताने कॉम्प्युटर, टी.व्ही, फोन यामुळे दिवसातला एकूण १०-१२ तास आपण सलग स्क्रीनकडे पाहात असतो.
 आपण हे सगळं करत असताना आपल्या डोळ्यांवर त्याचा किती परिणाम होत आहे याची आपल्याला जाणीवही नसते. 
स्क्रीनमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो-----
1)डोकेदुखीअस्पष्ट दिसणे.  
2)डोळ्यांवर ताण जाणवणे.
3)कोरडे डोळे
4)मान आणि खांदा दुखणे.डोळे जळजळणे किंवा डोळ्यांना खाज सुटणे.  
5)प्रकाशाबद्दल डोळ्यांची संवेदनशीलता वाढणे.
व्यायामाने तुमचे डोळे कसे निरोगी ठेवणार ----

आपण जे व्यायाम पाहणार आहोत ते इतके सोपे व साधे आहेत की, ते तुम्ही कधीही, कुठेही करू शकता.
 या व्यायामांसाठी कोणतेही उपकरण घेण्याची अथवा जिममध्ये जाण्याची अजिबात गरज नाही.
दिवसाच्या २४ तासांतील फक्त २० ते ३० मिनिटं वेळ खर्च करून आपले डोळे नक्की निरोगी ठेऊ शकतो. तर वृद्धत्वामुळे होणार्‍या डोळ्यांच्या समस्या अथवा डोळ्यांच्या काही गंभीर आजारांवर हे व्यायाम उपयुक्त ठरणार नाहीत.
पण डोळ्यांच्या काही सामान्य समस्या जसे डोळे दुखणे, जळजळणे, डोके दुखणे या लोकांसाठी हा व्यायाम नक्कीच लाभदायक ठरणार आहे.
जसे आपण निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम करतो तसेच डोळ्यांसाठी केला तर काही दिवसांनी दृष्टीमध्ये चांगले परिणाम दिसून येतील.

🟣डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी कसे व्यायाम करू शकतात. (दररोज करू शकता असे ४ व्यायाम) 
1)सलग डोळे फिरवणे----

चारही बाजूंनी आपले डोळे फिरवणे हा डोळ्यांवरील ताण घालवणारा चांगला व्यायाम आहे. तर हा व्यायाम करण्यासाठी सरळ बसा, समोर बघा, त्यामुळे खांद्यावर कोणताही ताण नको. आधी आपले डोळे उजव्या बाजूला घेऊन जा, मग डोळे वर न्या, मग डोळे खाली आणून आपल्या डाव्या बाजूला घेऊन जा व सगळ्यात शेवटी खाली जमिनीच्या दिशेने न्या. तर हाच व्यायाम परत दूसऱ्या दिशेने करा. हा झाला तुमचा एक सेट. असे सेट किमान १० वेळा करावे. ह्या व्यायाम करण्यासाठी तसे खूप वेळ लागत नाही. त्यामुळे थोडा वेळ आपण कामातून बाजूला काढून हा व्यायाम देखील करता येतो. फक्त त्यावेळी आपल्या नजरेसमोर स्क्रीन नसावे. यासाठी खूर्ची फिरवून भिंतीकडे तोंड करुन बसावे.  

2)तळवे व डोळ्यांचा व्यायाम---------

डोळे निरोगी ठेवण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आणि गरजेचे व्यायाम आहे. जेव्हा तुमचे डोळे थकलेले असतात तेव्हा हा व्यायाम केल्यास डोळ्यांना चांगले आराम मिळतो. हाताचे तळवे खोलगट करावे व ते डोळ्यांच्या खोबणीवर ठेवावे, डोळे मिटलेले असावे, डोळे मिटून काळोखा पलिकडे नजर एकवटावी. डोळे मिटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे इतर रंग-तरंग निर्माण होतात ते त्यामुळे काळ्या रंगात बदलतात. एक अर्ध्या मिनिटासाठी हा व्यायाम करावा. या व्यायामाने आपली नजर स्वच्छ होते आणि डोळ्यांना ताजेपणा जाणवतो.

3)डोळ्यांना दाब-----

या व्यायामातही हातांद्वारे डोळ्यांना आराम देता येतो. यासाठी डोळे मिटावेत आणि दीर्घ श्वसन करावे. बोटं मिटलेल्या पापण्यांवर ठेवावे आणि  बोटांनी हळूवार डोळे दाबावे. एक दहा सेकंद हा दाब ठेवावा. मग हळूवारच डोळे उघडावे. मग किमान दहा वेळा हे केल्यास थकलेल्या डोळ्यांना उत्तम आराम मिळतो.

4)हात घासून डोळ्यांवर ठेवणे त्यामुळे आराम वाटते-------
डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी हा व्यायाम चांगला आहे. त्यामुळे डोळ्यांना मस्त ऊब मिळते. त्यासाठी तुम्ही तळहात छान गरम होईपर्यंत एकमेकांवर घासावे व मग ते हळूच बंद डोळ्यांवर ठेवा. हाताच्या ऊबेने डोळ्यांनाही आराम मिळते. त्यामुळे डोळ्यांचे स्नायू सैलावतात. तर दोनदा-तीनदा ही कृती करावी.

हेमा निचरे

No comments:

Post a Comment