तुम्हाला माहीत आहे का लघवी करताना जळजळ का होते? जाणून घ्या कारणे आणि निदान
डिस्युरियाची अनेक कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लघवी करताना होणारी जळजळ जास्त त्रासदायक वाटत नसते. यामुळं त्याकडं दीर्घकाळ दुर्लक्ष केलं जातं आणि धोका वाढतो.
लघवी करताना जळजळ होण्याच्या त्रास आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी झाला असेल.
वैद्यकीय भाषेत याला डिसूरिया (Dysuria) म्हणतात. या अवस्थेत, कधीकधी लघवीच्या मार्गात जळजळ होते.
तर कधी तीव्र वेदना होतात.
परिस्थिती गंभीर झाल्यानंतर लघवी करताना आग होत असल्याचं जाणवतं. तसंच, जडपणाची भावनादेखील होते. लघवीचा थेट संबंध शरीरातील मूत्राशय आणि मूत्रपिंडाशी असल्यानं लघवी करताना या दोन्ही अवयवांवरही (Causes of painful urination or dysuria) परिणाम होतो.
या आजाराची वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसू शकतात. डिस्युरियाची अनेक कारणं असू शकतात.
बहुतेक प्रकरणांमध्ये, लघवी करताना होणारी जळजळ जास्त त्रासदायक वाटत नसते. यामुळं त्याकडं दीर्घकाळ दुर्लक्ष केलं जातं आणि धोका वाढतो. म्हणूनच, लघवीत जळजळ का होते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
काय आहे लघवीमध्ये जळजळ होण्याचं कारण-----
लघवीला जळजळ किंवा वेदनादायक लघवीची अनेक कारणे असू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीला मूत्रमार्गात संसर्ग झाला असेल; म्हणजेच, मूत्रमार्गात बॅक्टेरियाची संख्या जास्त प्रमाणात वाढली असेल, तर लघवीमध्ये जळजळ होऊ शकते.
या अवस्थेत वारंवार लघवीची इच्छा होणं, कधी लघवीच्या मार्गात रक्त येणं, ताप येणं, लघवी करताना जडपणा जाणवणं, पाठदुखी इत्यादी लक्षणं दिसतात.
क्लॅमिडीया, गोनोरिया, नागीण इत्यादी लैंगिक संक्रमित रोगांमुळंदेखील लघवी करताना जळजळ होते.
या स्थितीत वेगवेगळी लक्षणं दिसतात. यामध्ये गुप्तांगाभोवतीच्या भागात पुरळ किंवा फोडासारखी स्थिती होऊ शकते.
केमिकल-----------
काही रसायनांच्या वापरामुळंदेखील डिसूरिया होऊ शकतो. उदाहरणार्थ, काही साबण, सेंटेड टॉयलेट पेपर, गर्भनिरोधक फोम, व्हजायनल ल्युब्रिकण्ट, गुप्तांगासाठी वापरलेली काही रसायनं इत्यादींमुळेही लघवी करताना जळजळ होऊ शकते.
मुतखडा----------------
मुतखडा असल्यास लघवी करताना जळजळ होऊ शकते. यामध्ये लघवीचा रंग गुलाबी किंवा तपकिरी होतो. यासह त्यात ताप, उलट्या, बेचैनी यांसारखी लक्षणंही दिसू लागतात.
उपाय--------
1)लिंबू--
लिंबामध्ये अॅसिड असतं जे जीवाणू आणि विषाणूंपासून बचाव करतं. लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात टाका. त्यात मध मिसळा आणि दररोज रिकाम्या पोटी प्या.
2)काकडी-----
डिसयुरियामध्ये काकडी एक प्रभावी औषध मानलं जातं. जेव्हा शरीर हायड्रेटेड राहतं तेव्हा शरीरातील सर्व विषारी द्रव्य लघवीवाटे शरीराबाहेर जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका राहत नाही. काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे कार्य करते कारण त्यात 95% पाणी असतं. काकडीचा रस बनवून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यायल्याने डिसयुरिया बरा होतो.
3)मेथीचे दाणे-----
मेथीचे दाणे डिस्युरियामध्ये प्रभावी औषध म्हणून काम करतात. मेथीचे दाणे योनीमार्गाची सामान्य पीएच पातळी राखतं, संक्रमणापासून संरक्षण करतं, तसंच शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकण्याचं कार्य करतं. एक ग्लास ताकात अर्धा चमचा मेथी दाण्यांची पावडर मिसळून दररोज दोनदा सेवन करा.
4)दही----
दह्यामध्ये असे जीवाणू आहेत जे शरीरातले हानिकारक जीवाणू काढून टाकण्यासाठी कार्य करतं. दही खाल्ल्यानं लघवीमधील पीएच पातळी सामान्य राहण्यास मदत होते. दररोज तीन कप दही खाल्ल्यास लघवीच्या संसर्गामध्ये बराच फायदा होतो.
5)अॅपल सिडेर व्हिनेगर
या व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल आणि जीवाणू विरोधक गुणधर्म आहेत, जे बर्याच संक्रमणास प्रतिबंधित करतात. त्यात पोटॅशियम आणि बरीच खनिजं असतात, जे शरीराची सामान्य पीएच पातळी राखण्यासाठी कार्य करतात. एक ग्लास पाणी गरम करा त्यात एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळा. हे पाणी दिवसातून दोनदा प्या. या मुळे डिस्युरियाची समस्या दूर होईल.
6)भरपूर पाणी प्या
myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची गरज असते. वास्तविक पाणी प्रत्येक समस्येवर उपचार करतं. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं. लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भरपूर पाणी प्यावं.
No comments:
Post a Comment