जलपर्णीचा (Water hyacinth)
उगम प्रथम दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन खोर्यात झाला. हे जलतण पाण्यावर सहजपणे ३ फूट तरंगणारे, चकचकीत, रूंद, गर्द हिरवट काळपट, मेणचट पाने असलेले, छान मोहक, लिलीसारख्या रंगाचे ६ ते ७ फुले एकत्र असलेले, पोकळ वासा असलेले, दाटीने उगवणारे असे तण आहे.
दिसावयास मोहक असल्याने त्याची (Ornamental) शोभेची वनस्पती अशी प्रथम गणना करण्यात आली.
जेथे उष्ण समशीतोष्ण हवामान आहे, त्या जगतात ती जलप्रवासामार्फत पोहचली व डेमॉन ब्लूडेव्हिल, कर्स ऑफ बेंगाल, सिंर्डेला, खुनी सुंदरी (Beauty Killer) ह्या नावाने ओखळू जाऊ लागली.
साधारणपणे चार पद्धतीने जलपर्णी काढून टाकता येते किंवा कमी करता येते.
१) मनुष्यबळ वापरून,
२) मशिनरी वापरून,
३) तणनाशक यासारखी रसायने वापरून,
४) कीटक जलपर्णीवर सोडून.
पण यापैकी प्रत्येक पद्धतीला काहीना काही मर्यादा आहेत. मनुष्यबळ व मशिनला खोल पात्र, रुंद पात्र याच्यामध्ये मर्यादा येतात. तसेच ते खूप खर्चिक ठरते. माणसाच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. मशिनरी पात्रात आत जाऊ शकत नाहीत, खोली असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे तणनाशक फवारून क्लोरोफिलचा नाश करून जलपर्णी सुकवणे व त्यातून ती नष्ट करणे हा तसा सोपा उपाय असला, तरी अशा तणनाशक रसायनामुळे अशुद्ध सांडपाणी विषारी होते. त्याचबरोबर पुढे नदीच्या किंवा ओढ्याच्या काठावरच्या वनस्पती इतर जीवसृष्टीलाही यामुळे खूप मोठा धोका पोहोचतो. यामुळेच हा उपाय तर खूपच धोकादायक व दीर्घ पल्ल्यासाठी विनाशक आहे. कीटकांमार्फत जलपर्णी काढून टाकण्यावर तर खूपच मर्यादा आहेत.
जलपर्णी ही पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे.
हिचे देठ पोकळ, स्पंजप्रमाणे असतात. त्यावर साधारणत: ५ से. मी. आकार असलेली गर्द हिरव्या रंगाची पाने डोलत असतात.
ही वनस्पती तिला पोषक परिस्थिती मिळाली कि ५ दिवसात दुप्पट गतीने वाढत असते. वर्षात त्यामुळे एका जलपर्णीमुळे लाखो अहिरावण, महिरावण जलपर्णी निर्माण होतात. जेव्हा जेव्हा पाणी आटण्यास सुरूवात होते, त्यावेळी जलपर्णी बी वातावरणाशी जुळवून घेवून, वनसप्ती वाढ परतपरत करू शकते. साधारणत: ऑक्टोबरचा महिना भारतासाठी त्यासाठी उपयुक्त आहे. ह्या जलपर्णीत साधारणत: ९५ टक्के हे पाणीच असते. ह्यावरून पाणी खेचण्याची जलपर्णीची क्षमता तुमच्या ध्यानी येईल.
मग ही वनस्पती अक्षरश: गालीच्याप्रमाणे फोफावते. त्यामुळे ह्याच्या गर्दतेमुळे पाण्यात प्रकाश किरणांची वाट अडवली जाते. त्यामुळे Photosynthesis चे प्रमाण घटून त्याचा इतर जलजंतू, इतर जीव, जलवनस्पतीवर विपरित परिणाम होतो. मुख्यत: पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते. त्याचबरोबर तापमान कमी होवून जलसृष्टीला आवश्यक असणारी प्रकाशसंश्लेषक Photosynthesis प्रक्रिया पूर्ण होवू शकत नाही. त्यामुळे इतर उपयुक्त जैविक पाणवनस्पती वाढीवरही त्याचा परिणाम होतो.
जलपर्णीमुळे जलतण, डासांना राहण्यास, पैदास करण्यास आमंत्रण मिळते. त्यामुळे हिवताप साथीचा प्रादुर्भाव होवू शकतो. जलपर्णीमुळे शेतीवर ही परिणाम होतो. पाणीपुरवठा करणार्या वाहिन्या व कालवे ह्यात जलपर्णीने अडथळे निर्माण होतात. शिवाय धरणाच्या भिंती, कालव्यालगतचे पूल या सर्वांना जलपर्णीच्या वजनाने धोका निर्माण होतो. वीजनिर्मितीतही ही वनस्पती पाणीप्रवाहाला प्रचंड अडथळे आणू शकते.
मासेमारी करणार्या लोकांना ह्या जलपर्णी जाळ्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो, जलवाहतूकही प्रचंड त्रास सहन करावा लागतो, जलवाहतूकही प्रचंड प्रमाणावर थांबते. त्यामुळे नदी, कालवे येथून पोहोचणार्या गोष्टींवर कायम अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वेळ येते.
No comments:
Post a Comment