कोवळे ऊन कशाला म्हणतात------
कोवळ्या उन्हातून 'ड' जीवनसत्त्व मिळतं, असं सगळे म्हणतात.
पण नेमकं किती वेळ त्यात उभं राहावं,
नक्की कोणत्या वेळच्या उन्हातून ते मिळतं, याबद्दल सर्वांच्या मनात अनेक प्रश्न असतात.
व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणे जनतेला बेजार करत आहे.
त्यामुळे याविषयीच्या विविध शंका रुग्ण डॉक्टरांपुढे मांडत असतात.
हे व्हिटॅमिन एका सुप्त संप्रेरकाच्या अवस्थेत आपल्या त्वचेमध्ये असते.
शरीराला आवश्यक असलेल्या रूपात परावर्तित होण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
एकदा सूर्यप्रकाश मिळाला,
की शरीर या जीवनसत्त्वाचा लगेच वापर करू शकते.
आहारातून मिळणारं कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
ते सकाळच्या उन्हातून जास्त मिळते,
असा समज काही वर्षांपूर्वीपर्यंत होता;
परंतु सूर्यकिरणांचे तरंग काही ठराविक प्रमाणात असतील,
तरच आपल्या त्वचेतून वर सांगितल्याप्रमाणे 'ड' जीवनसत्त्व तयार होतं.
या विशिष्ट सूर्यकिरणांसाठी साधारण सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतील ऊन सगळ्यांत चांगलं.
आपल्या त्वचेचा रंग सावळा किंवा काळा असल्यास २० मिनिटांपेक्षा जास्त काळ उन्हात जाणं आवश्यक आहे.
गोरी त्वचा असेल, तर २० मिनिटांपर्यंतचा काळ पुरेसा आहे.
त्वचेच्या जास्तीत जास्त भागाला ऊन लागलं,
तर त्याचा फायदा जास्त मिळतो.
हे सर्व करताना आपल्याला उन्हाची अॅलर्जी नाही ना,
याची खात्री करून घ्या.
No comments:
Post a Comment