दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात.
हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो.
झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते.
याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे.
समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत.
हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्तर सुजू लागते.
साधारण २ तासांनी नाकपुडी बंद होते.
नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते.
दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात.
शरीराच्या एकाच भागावर मधूनअधून किंवा सातत्याने मुंग्या येण्याची अथवा तो भाग बधिर असण्याची भावना येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे.
शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असण्याचे आहे.
पक्षाघात (शरीराची उजवी अगर डावी बाजू शक्तीहीन होणे, लुळी पडणे) किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, या आजाराची सुरवात अशी होते.
डोक्यााला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या आभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे लक्षण आहे.
मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जिवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे
अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते.
एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्याकत दोष असल्याचे लक्षण असते.
दोन मणक्यांवतील चकत्या झिजतात, त्या सरकतात, त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो.
असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंज्याच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील “मीडियन’ शीर दाबली जात असते.
कार्पल टनेल सिंड्रोम काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटण्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व्ह कंडक्शान स्टडीज या तपासानंतर हे निदान निश्चिरत करता येते. मधुमेह या विकारात पायाच्या (व हातांच्यासुद्धा) शिरा कमजोर होऊ लागतात.
लघवीला वारंवार जावे लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली, तर लगेच रक्त-लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते.
अनेक रुग्णांना तळपायाची आग होते.
मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला किंवा रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते.
कॅपसॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात.
कॅपसॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. .
काही रुग्णांना उभे राहिले किंवा चालू लागले की पायांना मुंग्या येऊ लागतात. चालताना मधेच उभे राहण्याची वेळ आली तर पायात होणारा त्रास असह्य होऊ लागतो. आपल्या कमरेच्या मणक्याहतील चकत्या झिजून सरकल्या म्हणजे मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या चेताशिरांवर दाब येऊ लागतो, त्यामुळे हा त्रास होतो.
खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे.
पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का?
तर त्यासाठी ही 4 कारणे जबाबदार ठरतात.
1व्हिटॅमिनची कमतरता:
2 मानेची नस आखडणे
3मधुमेह
4 तासनतास एका जागेवर बसले
No comments:
Post a Comment