Saturday, 15 April 2023

अपमान पचवायला शिका..!

अपमान पचवायला शिका..!

दोन गोष्टी पचवायला मोठी ताकद लागते. मान आणि अपमान. मान पचवता आला नाही तर अहंकाराचे ढेकर येण्यास सुरुवात होते.
 मानाचे अपचन दुर्धर आजारासारखे वाटते, परंतु अपमान पचवणे त्यापेक्षाही कठीण आहे. मानाचा तर लोक विनम्रतेने सांभाळ करतात. मोठे होऊन विनम्र बनण्यात अहंकार संपुष्टात येतो.
 परंतु अपमान सहन करण्यासाठी मोठी हिंमत लागते.
 गेल्या काही दिवसांत अण्णा हजारे यांनी जीवनाचे जे सूत्र दिले होते, त्यात एक महत्त्वाचे होते. 
अपमान पचवायला शिका. थोडे धैर्य ठेवले आणि अपमान सहन केला तर अहंकार आणि क्रोध आपोआप गळून जातो. जेव्हा आपण चुकीच्या कामाबाबत विरोध करीत असतो तेव्हा भ्रष्टाचारी लोक आपल्याला चुकीचे ठरवण्यासाठी अपमानीत करण्याच्या विविध क्लृप्त्या शोधीत असतात.
आपला अहंकार सक्रिय असेल तर आपणही आक्रमक होणार आणि चुकीच्या विरोधात असलेल्या योग्य लक्ष्यापासून भरकटणार, विचलित होणार. 
उद्योगपती सुरेश गोयल यांनी सांगितले होते की अण्णांचे हे सूत्र त्वरित स्वीकारून अजमावलेही. 
या सूत्रामुळे त्यांना एक नवी दृष्टी मिळाली.
अपमान सहन करून तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता आणि लक्ष्यही प्राप्त करू शकता.
 रावणाने लंकेच्या सभेत हनुमानाचा अपमान केला होता. परंतु त्याने तो सहन केला आणि लंकेचे दहन, दुर्गुण विनाशाचे आपले लक्ष्य प्राप्त केले.

 बुद्ध, महावीर, विवेकानंद, गांधी आणि आता अण्णांपर्यंत ही परंपरा अनेक रूपांत येत राहिली आहे. अपमान पचवून चुकीच्या मार्गाला विरोध केल्यास तो यशस्वी होऊ शकतो.
आयुष्यात येणारे अपमान,अपयश आणि नुकसान कसे पचवायचे?

सदर प्रश्नाचे उत्तर मी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका प्रसंगाने देऊ इच्छितो.

बहुतेकांना माहीतच असेल कि महाराजांनी अगदी लहान असताना तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्यरूपी महावृक्षाचे बीज रोवले. 
चहूबाजूंनी शत्रूने वेढलेले असून देखील स्वराज्याचा विस्तार केला. 
काही काळानंतर मुघल सैन्य मिर्झा राजे जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यावर चाल करून आले आणि याच वेळी महाराजांनी पुरंदरचा तह केला.
महाराजांना 23 किल्ले आणि तब्बल 4 लाख होनांचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला. म्हणजेच महाराजांनी जवळपास 20 वर्षात जे काही मिळवलं होतं त्यापैकी 80% एका क्षणात गेलं.

आता तुम्ही विचार करा, जर आपल्यावर अशी वेळ आली असती तर आपण अगदी नैराश्यात जाऊन आत्महत्याच केली असती. 
आजकाल आपण बातम्या वाचतो कि, परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, बरीच अशी इतर उदाहरणं आहेत.

अपयश हि यशाची पहिली पायरी असते अशी मराठीत म्हण आहे. 
तर अपयशाने खचून न जाता त्यावर उपाय शोधून, त्यावर मात करून पुढे गेलं पाहिजे. 
पुरंदरचा तह हा एक मोठ्ठा आघातच म्हणावा लागेल, परंतु शिवरायांनी न डगमगता पुन्हा सुरुवात केली. मोजक्या मावळ्यांसोबत उभारलेले स्वराज्य काही दशकात मराठ्यांनी विस्तृत केले. 
सतराव्या शतकातील मराठा kingdom चे अठराव्या शतकात मराठा empire झाले.

यश-अपयश, फायदा-नुकसान असे चढ-उतार आयुष्यात येत-जात असतात, तुम्ही फक्त आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्या आणि परिणाम काहीही असो प्रयत्न करणे सोडू नका.

रोहित पालव

No comments:

Post a Comment