Saturday, 29 April 2023

42 दिवसांची विशेष रजा मिळणार केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय--------

42 दिवसांची विशेष रजा मिळणार केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय--------
केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अवयवदान केल्यास त्यास
 42 दिवसांची विशेष रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अवयव दान केल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागतो या पार्श्वभूमीवर हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी 30 विशेष रजा आहेत.
देशात मानवी अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार अवयवदार शस्त्रक्रिया करण्यात येतात.
 त्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला किडनी आणि यकृत हे दोनच अवयव देता येतात.
अवयव दात्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते क्षेत्र क्रिया केल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागतो.
हे गृहीत धरून 42 दिवसांची विशेष रजा देण्याचे ठरविण्यात आले आहे.
विशेष रजा इतर कोणत्याही रजेसोबत जोडून घेता येणार नाही अपवादात्मक परिस्थिती जर शस्त्रक्रियेमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाल्यास
 परवानाधारक डॉक्टरांच्या संमतीने अधिक रजा घेता येईल.

No comments:

Post a Comment