समजा तुम्ही एक कॅमेरा घेऊन एक शर्यत लांबून पाहत आहात.
आणि प्रत्येकी एक मिनीट झाला की एक फोटो काढत आहात. शर्यतीमध्ये खेळाडूंना एक गोलाकार मैदान तीनदा धावायचा आहे. समजा पहिल्या मिनीटाला एक खेळाडू एका ठराविक ठिकाणी असेल आणि तुम्ही त्याचा फोटो टिपला आणि समजा त्याची गती कमी झाली तर दुसर्या मिनीटाला तो खेळाडू आधीच्या ठिकाणापेक्षा थोडा मागे असेल. तिसर्या मिनीटाला त्याचा वेग आणखी कमी झाला तर तो दुसर्या मिनीट पेक्षा सुद्धा मागे असेल. आणि तुम्ही त्या खेळाडूचे प्रत्येक मिनीटास फोटो काढत आहात तर जेव्हा तुम्ही तिन्ही फोटो एका पाठोपाठ पहाल तेव्हा तो खेळाडू मागे जाताना दिसेल. म्हणजे त्या खेळाडूची एका ठराविक ठिकाणापासून स्थिती ही मागे मागे जाताना दिसेल.
मुळात तो मागे जातच नाहीये. त्याचे प्रत्येक मिनीटास असलेले ठराविक ठिकाण फक्त मागे मागे जातय.
हाच परिणाम आपल्या डोळ्यांवरही होतो जेव्हा आपण एका पंख्याकडे पाहत असतो.
पंख्याचा वेग हा नेहमी समानच असतो असे नाही.
समजा एखादा पंखा एका सेकंदात २० दा फिरतो. आता आपले डोळेसुद्धा कोणतीही गोष्ट सलग पाहत नाही तर तुकड्या तुकड्यांत पाहते.
पण कोणत्याही दोन तुकड्यांतला फरक एवढा कमी असतो की आपण पाहणारी गोष्ट सलगच घडतीये असा आपल्याला भास होतो.
आता समजा आपले डोळे सुद्धा एका सेकंदात २० तुकडे पाहून त्यावर प्रक्रिया करून एक चलचित्र तयार करते. त्यामुळे पंख्याचा प्रतिसेकंद फिरण्याचा वेग आणि डोळे ते २० चित्र प्रक्रिया करण्याचा वेग सारखा असल्याने पंखा फिरतचं नाहीये असं वाटतं. पण हा केवळ भास आहे.
आता जर पंख्याचा वेग २० वरुन १८ वर आला तर त्या शर्यतीप्रमाणेच त्या पंख्याच्या पात्याचे प्रतिसेकंद स्थान हे मागे मागे जात जाईल आणि तो पंखा उलटा फिरतोय असा भास आपल्यास होईल.
आपले डोळे जरी २० चित्र एका सेकंदात पाहत असले तरी पंखा एका सेकंदात १८ किंवा १६, १४, १२ वेळेस फिरत असेल तरी त्या पंख्याची पाते हळूहळू प्रत्येक सेकंदास मागे राहतील आणि तो पंखा मागे मागे जातोय असा भास होईल.
जसा जसा पंख्याचा वेग वाढत जाईल आणि २० चित्र प्रतिसेकंद पेक्षा पुढे जाईल तसा तसा तो पुढे जाताना दिसेल आणि जसा जसा वेग कमी होऊन २० चित्र प्रतिसेकंद पेक्षा कमी होईल तसा तसा तो मागे जाताना दिसेल. पण हे केवळ भास आहेत.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment