पृथ्वीवर आपण ज्या भागावर राहतो त्याला क्रस्ट (crust plate) आवरण म्हणतात. संशोधकांच्या मते ही जाडी काही ठिकाणी 8किमी तर काही ठिकाणी 25किमी पर्यंत आहे. त्यानंतर येते मॅनटल (mantle plate) जी लावा रस रुपात आहे. जी अंदाजे 2900किमी जाडीची आहे.
खरतर संशोधनसाठी पृथ्वी खोदणे हा प्रकार झालेला आठवत नाही, पण संशोधनासाठी खोलवर ड्रिल केलेल्यांची उदाहरणे वाचायला मिळतात. त्यातील सर्वात प्रसिद्ध संशोधन आहे रशियामधील कोला प्रोजेक्ट (kola superdeep borehole)
1965 ते 1995 हा प्रयोग झाला आणि इतक्या कालावधीत ते 9 इंचाच्या ड्रिल ने 40,230 फूट खोल ड्रिल करू शकले.
प्रोजेक्ट बंद होण्याचे कारण होते अपेक्षेपेक्षा अधिक तापमान, यामुळे आणखी खोलवर जाणे शक्य नव्हते. (त्यांनी 100° अपेक्षित केलेलं जे 150° च्या आसपास गेले.)
तर सध्यातरी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचे मुख्य कारण असेल तापमान. पण योग्य यंत्रणा, साधने आणि महत्वाचे म्हणजे असे प्रयोग करायला लागणारा निधी ही सुद्धा करणे असू शकतात.
No comments:
Post a Comment