मुलं काय करतील याचा नेम नाही....
मार्च-एप्रिल महिन्याचे ते दिवस म्हणजे परीक्षांचे परीक्षेच्या वेळेस सर्व मुलं अभ्यासात इतके मग्न असतात की कधी सुट्ट्या पडतील आणि कधी एकदा आपण मामाच्या गावाला जाऊ याची ओढ लागलेली असते.
त्यातच
सर्व मुलांचा नवीन मित्र म्हणजे मोबाईल.
मोबाईलच्या आहारी लहान मुलांपासून ते वयस्कर वयोवृद्ध माणसं सुद्धा या गोष्टींमध्ये मागे नाहीत.
नुकतेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचे पेपर संपलेले आहेत यातच मुलांना नवीन गोष्ट शिकण्याची उत्सुकता असते.
आणि मुलं काय करतील याचा नेम नसतो अशीच एक गोष्ट आज आमच्या परीने केले.
खूप दिवसापासून कोपऱ्यात पडलेले ते
'सॉक्स'परी आणि पिया च्या नजरेला पडले
आणि
मग काय युट्युब वर पाहिलेली एक कल्पना त्यांच्या मनात सुचले आणि त्या पद्धतीने सर्व साहित्य मोजमाप करण्याची तयारी सुरू झाली.
काहीतरी चाललं होतं त्यांच्यासोबत एक छोटीशी प्लास्टिकची बाहूली सुद्धा सोबत होती.
दुपारची वेळ कात्री कोपऱ्यात पडलेले एक सॉक्स,रबर आणि दोरी या सगळ्या गोष्टी जमवून ते कोणत्यातरी वस्तू बनवण्याच्या नादात होते.
काही वेळाने त्या सॉक्सचे दोन तुकडे करण्यात आले कात्रीने.. या गोष्टींची माहिती आम्हाला नव्हती.
पाहता-पाहता त्या सॉक्सला दोन तुकड्यांमध्ये विभाजन करून घेतले.वरून त्या सॉक्सची छाटणी करण्यात आली
त्या सॉक्सचे एक भाग त्या बाहूलीला घालण्यात आले.बाहुलीला रबर बँड साह्याने बांधण्यात आलं काही वेळेस मोबाईल मुलांना खूप चांगली शिकवून दिली जाते.
पण त्याच प्रकारे त्याचं वापर गैरवापर सुद्धा होऊ शकतो. रबरच्या साह्याने त्यावेळेस बाहूलीला बांधल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा ड्रेस त्या बाहूलीला तयार करण्यात आला पाहताक्षणी बाहूली इतकी नजरेत भरली.
की फोटो काढण्याचा मोह कुणालाही सूटला नसता कारण बाहुली बेस्ट दिसायला खूप सुंदर आणि मोहक झाली होती. या सगळ्या गोष्टी पाहून मनाला खूप आनंद झाला की मुलं सुद्धा या मोबाईलचा उपयोग करून नवीन काहीतरी शिकू शकतात ते सुद्धा आपल्या कल्पनेच्या बाहेर
आपण सुध्दा मुलांना मोबाईल जरूर द्यावा.
पण मुलं त्या मोबाईलचा वापर कसा करतात हे सुद्धा पालकांनी तितकच जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे.
मोबाईल मध्ये कितीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळतात नवीन शिकायला मिळतात फक्त मुलांना त्याची आवड निर्माण करून द्यायला हवी.
सुट्टी उन्हाळ्याची आहे आणि मोठी सुद्धा...
मुलं या सुट्टीमध्ये खूप काही शिकू शकतात.
फक्त आपण त्यांना मार्ग दाखवला पाहिजे.
आणि आपण तो दाखवतोच
सांगायचे इतकंच की मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव द्या त्यांच्या आवडीनिवडी पहा आणि त्याप्रमाणे त्यांना मार्ग दाखवा
आमच्या परीने केलेली ही छोटीशी भेट आपणा सर्वांसाठी आवडली तर नक्की सांगा..
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मुलांना सुट्टीत लागणारे साहित्य-----
स्केचपेन,रद्दी कागद,छोटीशी कात्री,डिंक,फेविकॉल,घोटीव कागद,सेल,लहान झिरो बल्ब,थर्माकोल,खेळणी,दोरी,सॉक्स, कापूस,बाहुली,सुई,रबर
प्रांजली राहुल म्हमाणे
2 री कमळ गट
प्रियांशी राहुल म्हमाणे
UKG.
8482824588
आपणही अशा प्रेरणादायी कथा गोष्टी असतील तर नक्की शेअर करा
No comments:
Post a Comment