पृथ्वी ज्या वेगाने भ्रमण करते तो वेग आपल्याला जाणवत नाही, कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाशी जोडले गेलो आहोत आणि त्यामुळे पृथ्वी आणि आपल्यामध्ये कोणतेही थेट relative motion नाही.
आपण देखील त्याच वेगाने फिरत आहोत ज्या वेगाने पृथ्वी फिरत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की relative motion म्हणजे काय?
तसे पाहायला गेले तर, सर्वच motion ह्या relative असतात. परंतु आपले शरीरदेखील पृथ्वीसोबत फिरत असल्या कारणाने, आपले शरीर स्थिर असते.
म्हणजेच पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने आपले शरीर देखील फिरत असते. हेच कारण आहे की आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जाणवत नाही.
आपण एका उदाहरणासह ही प्रक्रिया समजून घेऊ म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल.
समजा तुम्ही चालत्या बसमध्ये कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात, तर ते पुन्हा तुमच्या हातातच येऊन पडेल. कारण तुम्ही बसच्या गतीने जात आहात. त्यामुळे त्या गतीचा कॉईनवर कोणताच परिणाम होणार नाही.
पण समजा रस्त्यात एक मोठे वळण आले आहे आणि बस ज्यावेळेस त्या वळणावर असेल, नेमके त्याचवेळेस तुम्ही कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र त्याचा कॉईनवर परिणाम होईल. अशावेळी ते कॉइन इतरत्र जाऊन पडेल.
कारण बसने वेगळ्या दिशेमध्ये गती घेतल्यामुळे कॉईनची स्थिर स्थिती बदलली आणि कॉईन देखील बसच्या गतीबरोबर जाऊ लागला.
त्याचप्रकारे, आपण देखील पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहतो. त्यामुळे आपल्याला पृथ्वीची गती जाणवत नाही. आपल्याला पृथ्वीची गती तेव्हाच जाणवेल, जेव्हा पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल, तिला हादरा बसेल किंवा जेव्हा पृथ्वी तिची दिशा बदलेल.
शांघाई माग्लेव ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिचा वेग आहे ताशी ४३१ किमी! पण आपल्या पृथ्वीचा वेग त्याहून कितीतरी जास्त म्हणजे ताशी १६७० किमी इतका आहे.
जर तुम्ही कधी या ट्रेनने प्रवास केलात तर त्यावेळेस ट्रेनमध्ये जोरात उडी मारून पहा, जेव्हा तुम्ही हवेत असाल तेव्हा तुमचा पृथ्वीशी असलेल्या गतीसोबतचा संपर्क तुटेल आणि तुम्ही चांगलेच धडपडाल! (पण हा साहसी प्रकार जरा जपूनच ट्राय करा)
No comments:
Post a Comment