सोलापूर : आधारकार्डशी संबंधित विविध सेवा नागरिकांना सहज आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर पोस्टल विभागाच्या वतीने महाआधार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या महाआधार शिबिरामध्ये नागरिकांना आधारसंबंधित आवश्यक नोंदणी व दुरुस्तीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आधारकार्डमध्ये आवश्यक बदल किंवा दुरुस्ती करावयाची असल्यास नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
हे शिबिर सोलापूर शहरातील दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर मुख्य टपाल कार्यालय, रेल्वे स्टेशनसमोर, सोलापूर तसेच गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस,सोलापूर येथे नागरिकांसाठी आधार सेवा उपलब्ध असतील.
सोलापूर पोस्टल विभागाने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाआधार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.