शून्य 0 चा शोध कोणी लावला ?
ह्या जगात अनेक शोध लागले, ज्यामुळे मानव जीवन पूर्णतः बदलून गेले आहे, अशाच एक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्व पूर्ण शोध हजरो वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात लागला. हा शोध होता शून्याचा, हा इतका महत्वपूर्ण शोध होता जो अस्तित्वात आला नास्ता तर कदाचित वर्तमान काळात अस्तित्वात असणारे अनेक शोध लागलेच नसते.
जसे कि, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते, ज्याचा पाय हा संगणक आहे. अनेक लोकांचे असे सांगणे आहे कि, संगणक हे ऑपरेटिंग सिस्टिम च्या आधारे कार्य करते, तर अनेक लोक प्रोग्रॅमींग मुळे संगणक कार्य करते असे म्हणतात, हि माहिती संपूर्ण बरोबर नाही आणि चुकीची देखील नाही.
संपूर्ण संगणक प्रणाली हि बायनरी भाषेच्या आधारे कार्य पार पाडत असते. बायनरी म्हणजे दोन. हि भाषा दोन अंकांना एकत्रित करून तयार करण्यात आली आहे, त्यातील पहिला अंक शून्य असून दुसरा अंक एक हा आहे. ह्या वरून आपण समजूच शकतो कि शून्याचा शोध नसता लागला, तर कदाचित आज संगणक प्रणाली इतकी प्रगत झालीच नसती किंवा अस्तित्वातच आली नसती.
इतक्या महत्वाच्या शोधाचा सर्वाना परिचय तर आहे, परंतु कोणत्या भारतीय व्यक्तीने ह्याचा शोध लावला हे बऱ्याच लोकांना माहित म्हणून, ह्या लेख द्वारे आपण शून्य 0 चा शोध कोणी लावला, शून्याचा इतिहास आणि इतर बऱ्याच घटकांची माहिती पाहणार आहोत.
शून्य एक गणिती अंक आहे, ज्याचा साधारणतः उपयोग हा आकडेमोड करण्यासाठी आणि मोठमोठे गणिती समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो.
कदाचितच असे समीकरण असेल जे शून्य शिवाय सोडवले जाऊ शकते. असा हा शून्य गणिती जगात असाधारण आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का, कि ह्या असाधारण संख्येयची स्वतःची काहीच किंमत नाही हेच शून्याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे. स्वतःची काहीच किंमत नाही परंतु, जर हाच शून्य दुसऱ्या संख्येचा पाठी लावला, कि त्या संख्येची किंमत आहे त्यापेक्षा दहा पटीने वाढते आणि ह्या उलट एखाद्या संख्येच्या आदि शून्य लावला कि, त्या संख्येच्या किमती मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही, हेच शून्याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे.
शुन्याचा शोध लागण्यापूर्वी गणिती विश्वात १,२,३,४,५,६,७,८,९ केवळ ह्याच संख्या वापरल्या जात होत्या, परंतु जेव्हा पासून शून्य अस्तित्वात आले तेव्हा पासून असंख्य संख्या अस्तित्वात आल्या जसे कि १०२,१०३,१०३,१०४ … इत्यादी.
शून्या 0 चा शोध कोणी लावला ?
शुन्य 0 चा शोध भारतात इ.स. ५०० च्या दशकात लागला असून, हा शोध भारतीय ज्योतिषतज्ञ आणि गणितज्ञा आर्यभट्ट ह्यांनी लावला. हा शोध नेमक्या कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला लागला हे अद्याप कोणालाच माहित नसून ह्या बाबत वैज्ञानिकांनी विविध तर्क लावले आहेत.
आर्यभट्ट हे प्राचीन भारतातील खूप मोठे गणितज्ञ होते, ज्यांचा जन्म ४७६ ह्या साली कुसूमपूर भारतात झाला, ही माहिती आर्यभट्टानि लिहिलेल्या ग्रंथातून प्राप्त झाली आहे.
No comments:
Post a Comment