Monday, 17 April 2023

औषधांच्या गोळ्या विविधरंगी आणि आकारामागचं कारण माहिती आहे का?

औषधांच्या गोळ्या विविधरंगी आणि आकारामागचं कारण माहिती आहे का?

आजारी (sick) पडल्यानंतर आपण विविध रंगातील आणि आकारातील औषधांच्या गोळ्यांचे सेवन (takes pills) केलं असेल. 
मात्र, या गोळ्या रंगीत का असतात? 
किंवा याचा आकार कसा ठरवला जातो? याचा कधी विचार केलाय का?
तुम्ही निळ्या, पिवळ्या आणि फिकट गुलाबी रंगाच्या गोळ्या बर्‍याच वेळा पाहिल्या असतील, पण कधी विचार केला आहे, गोळ्यांना विविधरंगी बनवण्यामागचे कारण काय आहे?
 त्या गोल किंवा आयताकृती आकारात का बनवल्या जातात? यामागे एक सायन्स आहे. 
गोळ्यांना रंग देण्यामागे आणि त्यांना वेगवेगळे आकार देण्यामागे एक कारण आहे.
 त्याबद्दल जाणून घेऊयात.
गोळ्यांचा आकार त्याच्या डोसवर अवलंबून असतो. 
हा आकार ठरवताना खूप काळजी घेतली जाते. 
गोळी खाताना ती घशात अडकू नये, त्यामुळे त्याच्या कडा नेहमी गोलाकार बनवल्या जातात. 
त्यामुळे गोळी गिळताना मदत होते. 
अनेकदा गोळ्यांचा आकार ठरवण्यामागे फार्मा कंपन्यांचे मार्केटिंग धोरण असते.
 अनेक औषध कंपन्या स्वतःच्या औषधांच्या मार्केटिंगसाठी त्या बनवत असलेल्या गोळ्यांना वेगवेगळे आकार देतात. 
अनेक फार्मा कंपन्या त्या बनवत असणाऱ्या गोळ्यांचा आकार ठरवतात. हा आकारच संबंधित कंपनीची ओळख असते, व त्या इतर कंपनीच्या गोळ्यांपेक्षा वेगळ्या दिसतात.
गोळ्यांच्या रंगाबाबत विचार केल्यास, बहुतेकवेळा गोळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात, पण काही विविधरंगी असतात. गोळीचा रंग हा ती ज्या केमिकलपासून किंवा औषधापासून तयार केलेली आहे, त्यावरून ठरतो. 
याचाच अर्थ केमिकलचा रंग जसा असेल, त्याच रंगात गोळी तयार होईल. 
उदाहरणार्थ, बर्बेरिन ही गोळी पिवळी आहे. 
कारण त्यात असणाऱ्या औषधाचा रंग पिवळा आहे. त्याचप्रमाणे कार्बनचा वापर करून बनवलेल्या गोळ्यांचा रंग काळा असतो. 
रंगावरून सुद्धा गोळी कोणत्या आजाराशी संबंधित असू शकते, याचा अंदाज लावला जातो. 
या रंगाच्या आधारे गोळी ओळखण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment