अश्विन शुद्ध ११ शके १६०३ म्हणजेच २७ ऑक्टोबर १६८१ ह्या दिवशी सोयरबाईंचा मृत्यू झाला.
सप्तमहालाच्या दिशेने दासी मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता.
तो आवाज ऐकून संभाजी महाराज आणि येसूबाई त्या दिशेने धावल्या आणि तिथे जाऊन बघतात
तर सोयराबाई राणीसाहेब बिछायतीमध्ये निपचित पडल्या होत्या.
सोयरबाईंचे शरीर निळेकाळे झाले होते.
राजवैद्यांना बोलवण्यात आलं.त्यांनी अस निदान केलं की आदल्या रात्रीच राणीसाहेबांनी हिरकणी घेऊन आत्मघात केला होता.
संभाजी महाराजांनी राणीसाहेबाना मंत्राग्नी दिला आणि क्रियासंस्कार पार पाडले.
इतिहास्कारांमध्ये असा एक मतप्रवाह आहे की 'सोयराबाई ह्या संभाजी महाराजांकडून मारल्या गेल्या'पण तत्कालीन पुरावे बघता अस लक्षात येत की शंभूराजांचा राज्याभिषेक झाल्या नंतर राणीसाहेब रायगडावर निदान वर्ष दिड वर्ष तरी जिवंत होत्या.
माझ्यामते मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर सर्वात जास्त कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो नक्कीच संभाजी महाराजांना.
त्यांचा खरा इतिहास झाकोळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न झाला आहे. त्याची कारणे पण आहेत
पण तो वेगळा भाग आहे.
Quora
No comments:
Post a Comment