यासाठी नारळाचे तेलास नैसर्गिक तेल असे म्हटले जाते.
खोबऱ्याचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामूळे केसांना लावण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
नारळामधील लॅरिक एसिड माणसाला विविध संक्रमणांशी लढण्यास साहाय्यभूत असते. नारळाच्या तेलामध्ये बरीच जीवनसतत्त्वे आणि खूप काही नैसर्गिक औषधी गुण असतात.नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप लाभ होऊ शकतो.
ते मुख्यतः खोलीच्या तपमानावर द्रव असतात आणि आता कमी तापमानात ते घट्ट होत नाहीत. उदाहरणार्थ, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल कमी तापमानात पर्यायी विभाग करत नाही. त्यामुळे, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्च्या जास्त टक्केवारीमुळे नारळाचे तेल बर्फात घट्ट होते
हिवाळ्यात खोबरेल तेल सारखेच गोठत असल्यास हा उपाय करा...
१. गोठलेले तेल एका बाऊलमध्ये काढून ते गॅसवर किंचित गरम करून संपूर्णपणे वितळवून घ्यावे. २. खोबरेल तेल संपूर्णपणे वितळले आहे याची खात्री करून मगच त्यात १ टेबलस्पून आवळा ऑइल घालावे.३. १ टेबलस्पून आवळा ऑइलच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तेल वापरू शकता. उदा. बदामाचे तेल, तिळाचे तेल. ४. वितळवून घेतलेल्या खोबरेल तेलामध्ये इतर कोणतेही तेल मिसळल्यास त्या तेलातील पोषक तत्व व काही घटक खोबरेल तेलामध्ये उतरतात व यामुळेच खोबरेल तेल वारंवार गोठत नाही. ५. हा उपाय नक्की घरी करून पाहा. वारंवार गोठणाऱ्या खोबरेल तेलाला हा सोपा उपाय करून सारखेच गोठण्यापासून वाचवू शकता.
No comments:
Post a Comment