Saturday, 8 April 2023

प्रेरणादायी--- अपयशाला मात देणारा-प्रदीप शिंदे

लोकांना रिकामा,टाइमपास वाटणारी आवड आता त्यांची आणि कुटुंबियांची ओळख बनली आहे;सतत अपयश धरसोड सहन करूनही चित्रकला जगणाऱ्या सुरक्षारक्षक प्रदीप शिंदे यांच्या विषयी..........

झाडांच्या पानासाठी हलकासा आगातही चुरा होण्यासाठी पुरेसा असतो.
मात्र वडगाव पिंगळा येथील प्रदीप शिंदे या कलाकाराने पिंपळाच्या पानावर कटरच्या साह्याने कोरीव काम करत आपल्या चित्राप्रती असलेली कला जोपासली आहे.
या कलाकाराच्या माध्यमातून लोकांना या कलेची जणू भुरळ पडली आहे.
वडगाव पिंगळा मध्ये वास्तव्य असलेल्या 31 वर्षीय प्रदीप शिंदे याने कोरोना नंतर या कलेची आवड लागली आणि या माध्यमातून त्याचा जीवन प्रवास बदलत गेला
 विशेष म्हणजे या प्रदीपने या कलेचे कुठल्याही प्रकारे औपचारिक शिक्षण न घेता चित्र रेखाटन असो किंवा पानावरील कलाकृती असो हे स्वतः आत्मसात केलेले आहे.
प्रदीप शिंदे यांनी पानावर विविध नावे व्यक्तीचित्र,अशोक स्तंभ,राजमुद्रा हुबेहूब साकारली आहेत.
तो यासाठी लागणारे पिंपळाची पाणी स्वतः जाऊन त्यांची निवड करून आणतो.
आपल्याकडे असलेल्या छोट्याशा साहित्य द्वारे वडाच्या व पिंपळाच्या पानावर तो खास 
अशी कलाकृती साकारत आहे.
पिंपळाचे नाजूक जाळीदार पानांवर कोरलेली चित्रे पाहण्यासाठी सर्व लोक आतुर असतात प्रदीप याचा चहाच्या टपरीवर उदरनिर्वाह असून 
यातून वेळ काढून टपरीमध्ये हे काम करतो 
प्रदीप ला चित्रकलेवर जीवापाड प्रेम आहे.
या प्रेमातूनच चित्रकलेचे शिक्षण घेत आज कलाकार म्हणून कार्यरत असताना
 त्याच्यातील कलाकार जिवंत ठेवला आहे.
 प्रदीप सुरक्षा रक्षक असल्याने दिवसभर बराच वेळ मिळत होता 
त्यामुळे ड्युटीवर असतानाही ते चित्र रेखाटत चित्रकलेची आवड निर्माण झाल्याने
 त्यांनी youtube च्या आधारे चित्रकलेतील बारकावे शिकण्यास सुरुवात केली. 
सोशल मीडियावरील उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद पाहून
 शाळेतील शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी 
चित्रकार राहुल पगारे यांच्याशी प्रदीप शिंदे यांची ओळख करून दिली.

छत्रपती संभाजीराजांनी थोपटली पाठ --
युवराज संभाजी राजे हे नाशिक दौऱ्यावर असताना प्रदीप ने त्यांना त्यांचे पेन्सिल स्केच व पिंपळाच्या पानावरील राजमुद्रा दिली असता संभाजी राजे यांनी त्यांच्यावर खुश होत त्याच्या कलेला दाद देत पाठीवरती शाब्बासकीची थाप दिली.
मी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलो तरी 
मला त्याची लाज वाटत नाही.
घेतलेल्या शिक्षणावर मी सुरक्षारक्षक झालो 
मात्र माझ्यातील कलेला कार्यालयातील वरिष्ठ व शिक्षक आणि प्रोत्साहन दिले
 चांगली कला अवगत झाल्यामुळे आनंद वाटत आहे.
 चित्रकार 
प्रदीप शिंदे
9325990977
महाराष्ट्र मध्ये जरी कोणाला आपली अथवा आपल्या परिवारांचे चित्र
 पिंपळाच्या पानावर रेखाटन करून हवे असल्यास
 9325990977 
वरील दिलेल्या नंबरशी संपर्क साधून ते आपण मिळवू शकता
 तेही कमी किंमतीमध्ये 
त्यासोबत ते लॅमिनेशन करून आपल्या दिलेल्या पत्त्यावर सुद्धा ते सहज उपलब्ध होईल.

rahul2407.blogspot.com

No comments:

Post a Comment