मी लहान असताना मला हवेत उडण्याविषयी प्रचंड कुतूहल होते. आपल्याकडे सर्वात उंच उडणारा, सगळ्यां
ना माहिती असलेला पक्षी म्हणे घार.पण नंतर कळलं कि घार बाकी काही पक्ष्यांच्या तुलनेत अगदीच चिल्लर आहे.
पक्ष्यांच्या पंख न हलवता उडण्याच्या क्रियेला Soaring (शब्दशः अर्थ- उंच जाणे) असे म्हणतात.
काळी गिधाडे, गरुड, बहिरी ससाणा इत्यादी पक्षी हे यात निष्णात आहेत.
परंतु यांना सर्वात महत्वाचा फायदा होतो तो सूर्याचा..!! कसा? सूर्यामुळे हवा गरम होऊन वरच्या दिशेने प्रवाही होत असते. याला Warm Air Column किंवा Thermals असे म्हणतात. या गरम हवेच्या स्तंभाचा वापर हे पक्षी करत असतात. आता काहीच पक्षी का सगळेच पक्षी का नाही हा प्रश्न स्वाभाविक आहे.
त्याला काही महत्वाची करणे आहेत:
१. यांचे वजन आणि पंखांचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर हे सर्वात कमी असते. म्हणजे यांचे वजन कमी आणि त्या वजनाच्या मानाने पंख मोठे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने) आणि दणकट असतात.
२. या पक्ष्यांचे पंख लांबीला कमी आणि रुंदीला जास्त असतात. या वैशिष्ट्यामुळे तो चांगला Drag (ओढ) तयार करू शकतात. ओढ म्हणजे जास्त आणि रूंद क्षेत्रफळाचा फायदा घेउन हवेला पंखाच्या मागील बाजूस ढकलणे.
३. यांच्या पंखाच्या कडेला काही मोठी आणि मजबूत पिसे असतात. जेव्हा हे पक्षी खुप उंचीवर जातात तेव्हा हे पिसे ते एकमेकांपासून लांब पसरतात जेणेकरून विमानाच्या पंखाप्रमाणे आकार तयार करून वाहत्या हवेचा फायदा करून घेता यावा.
जरी आपल्याला असे वाटत असले कि हे पक्षी एका समान उंचीवर आहेत तरी प्रत्यक्षात तसे नसते. जेव्हा ते पंख हलवत नसतात तेव्हा ते प्रति सेकंद काही फूट खाली येतच असतात. याला Sink (शब्दशः अर्थ- बुडणे) असे म्हणतात. गरुड सरासरी २ फूट/सेकंद खाली येत असतो तर गिधाडे सरासरी ३ फूट/सेकंद.
काही पक्षी पंख न फडफडता कितीतरी वेळपर्यंत आकाशात कसे उडत राहू शकतात?
मी लहान असताना मला हवेत उडण्याविषयी प्रचंड कुतूहल होते. आपल्याकडे सर्वात उंच उडणारा, सगळ्यांना माहिती असलेला पक्षी म्हणे घार. पण नंतर कळलं कि घार बाकी काही पक्ष्यांच्या तुलनेत अगदीच चिल्लर आहे.
पक्ष्यांच्या पंख न हलवता उडण्याच्या क्रियेला Soaring (शब्दशः अर्थ- उंच जाणे) असे म्हणतात.
काळी गिधाडे, गरुड, बहिरी ससाणा इत्यादी पक्षी हे यात निष्णात आहेत.
हे पक्षी उंची गाठण्यासाठी डोंगरांमुळे अडथळा येऊन जी हवा वरच्या दिशेला वाहते त्याचा वापर करतात.
परंतु यांना सर्वात महत्वाचा फायदा होतो तो सूर्याचा..!! कसा? सूर्यामुळे हवा गरम होऊन वरच्या दिशेने प्रवाही होत असते. याला Warm Air Column किंवा Thermals असे म्हणतात. या गरम हवेच्या स्तंभाचा वापर हे पक्षी करत असतात. आता काहीच पक्षी का सगळेच पक्षी का नाही हा प्रश्न स्वाभाविक आहे.
त्याला काही महत्वाची करणे आहेत:
१. यांचे वजन आणि पंखांचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर हे सर्वात कमी असते. म्हणजे यांचे वजन कमी आणि त्या वजनाच्या मानाने पंख मोठे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने) आणि दणकट असतात.
२. या पक्ष्यांचे पंख लांबीला कमी आणि रुंदीला जास्त असतात. या वैशिष्ट्यामुळे तो चांगला Drag (ओढ) तयार करू शकतात. ओढ म्हणजे जास्त आणि रूंद क्षेत्रफळाचा फायदा घेउन हवेला पंखाच्या मागील बाजूस ढकलणे.
३. यांच्या पंखाच्या कडेला काही मोठी आणि मजबूत पिसे असतात. जेव्हा हे पक्षी खुप उंचीवर जातात तेव्हा हे पिसे ते एकमेकांपासून लांब पसरतात जेणेकरून विमानाच्या पंखाप्रमाणे आकार तयार करून वाहत्या हवेचा फायदा करून घेता यावा.
जरी आपल्याला असे वाटत असले कि हे पक्षी एका समान उंचीवर आहेत तरी प्रत्यक्षात तसे नसते. जेव्हा ते पंख हलवत नसतात तेव्हा ते प्रति सेकंद काही फूट खाली येतच असतात. याला Sink (शब्दशः अर्थ- बुडणे) असे म्हणतात. गरुड सरासरी २ फूट/सेकंद खाली येत असतो तर गिधाडे सरासरी ३ फूट/सेकंद.
Albatross नावाचा एक पक्षी आहे. याचे काही आकडे पहिले तर आपले डोळे फिरतील.
१. हे महाशय साधारण २००-३०० किमी. अंतर पंख न हलवता सहज कापू शकतात..!!
२. १२० किमी/तास एवढा प्रचंड वेग तो सहज साध्य करू शकतो
३. एका दिवसात ५००-६०० किमी प्रवास म्हणजे यांच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.
Thermals चा वापर करून काही रिमोट controlled विमाने सुद्धा उंची गाठतात. ज्यांना UAV (Unmanned Aerial Vehicle) असे म्हणतात.

No comments:
Post a Comment