Saturday, 22 April 2023

पहिले पाऊल उपक्रम आजपासून शाळा पूर्वतयारीसाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार----

पहिले पाऊल उपक्रम आजपासून शाळा पूर्वतयारीसाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार----


शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून शाळा पूर्वतयारी करण्यासाठी पहिले पाऊल या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. 
प्रारंभी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची सुरुवात होणार असून त्यामध्ये टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राज्यभरात राबवला जाणार असल्याचे समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले.
 पहिले पाऊल या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शाळांमध्ये मागील काही महिन्यांपासून नियोजन करण्यात आले होते.
त्यापैकी पहिल्या टप्प्याची उद्यापासून सुरुवात होणार आहे 
30 एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होईल.

तर कोल्हापूर,पुणे,नाशिक,छत्रपती नगर नागपूर जिल्ह्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या माध्यमातून उपक्रमाच्या आयोजन केले जाणार आहे.
ग्रामीण भागात शालेय शिक्षण विभागासोबत महिला बालविकास स्थानिक सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार असल्याचे पगार यांनी सांगितले
 सण 23-24 या शैक्षणिक वर्षात पहिलीत दाखल मुलांच्या शाळा पूर्वतयारीसाठी पहिले पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
 हा कार्यक्रम प्रत्येक वाडीवस्तीवर राबवला जाणार असल्याचे सांगितले आहे.
🟣दुसरा टप्पा जूनमध्ये-----

पहिले पाऊल उपक्रमाचा पहिला टप्पा आता सुरू झाल्यानंतर दुसरा टप्पा जून महिना सुरू होईल.
त्यावेळी शालेय शिक्षण महिला व बालविकास आणि सहभागी घटकांनी सहभागी होऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता पालकांना मुख्याध्यापकांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment