Wednesday, 19 April 2023

जर पाण्यात ऑक्सिजन असेल तर आपण श्वास का घेऊ शकत नाही?

जर पाण्यात ऑक्सिजन असेल तर आपण श्वास का घेऊ शकत नाही?
आपली श्वसन संस्था / फुफ्फुसे हवा आत ओढून घेतात व ती फुफसात असलेल्या वायुकोषतील अति सूक्ष्म अशा रक्त वाहीन्यातील रक्ताच्या संपर्कात आणतात.

येथे रक्तातील हिमोग्लोबिन (जे लाल रक्त पेशी मधे असते) आपल्यात साठलेला कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडतो हवेतील मुक्त प्राण वायू शोषून घेतो.

पाण्यात असलेला प्राणवायू हा मुक्त नसून तो पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असतो. त्या मूळे आपली श्वसन संस्था त्याचा वापर करू शकत नाही.
आपण बुडबुडे बघीतले असतीलच. 
यात पाणी आतल्या पोकळीत हवा साठवून ठेवते. पण जर आतली हवा वापरायची असेल तर बुड बुडा फोडणे गरजेचे आहे. पाण्यात विरघळलेला प्राण वायू एक प्रकारे पाण्याच्या रेणू च्या असाच बंधनात असतो. 
हे बंधन तोडण्याची क्षमता आपल्या श्वसन संस्थेतील कुठल्याही इंद्रियाना नसते.

मासे
हे पाणी आत ओढून घेतात व ते त्यांच्या GILLS / कल्ले वरून सोडतात. या ठिकाणी कल्ले पाण्यात विरघळलेल्या अवस्थेतील प्राण वायू शोषून घेतात.

असे कल्ले / अथवा तशी क्षमता वाले इंद्रिय माणसात नसते म्हणून आपण पाण्यात विरघळलेला प्राणवायू चां वापर करू शकत नाही.
कासव, बेडूक / Whale व्हेल मासे व असे इतर मोठे जलचर - जसे मगर, पाण घोडे, गेंडे वगैरे पाण्यात जीवन व्यथित जरूर करतात.
 याना आपल्या सारखी फुफ्फुसे असतात व ते फक्त हवेतील मुक्त प्राण वायुचाच श्वसन साठी वापर करू शकतात.

पण त्यांना सुध्दा श्वास घेण्यासाठी आपले नाक पाण्याच्या पृष्भागाच्या बाहेर काढून हवा ओढून घ्यावी लागते.

निसर्गाने त्यांना आणखी एक वरदान दिले आहे. ते म्हणजे high tidal volume. म्हणजे प्राण वायूची शारीरिक गरज (त्यांच्या शारीरक आकारमान सापेक्ष) भागवण्या साठी कमीत कमी जितकी हवा ओढून घेतली पाहिजे त्या पेक्षा कितीतरी जास्त हवा त्यांची फुफुसे साठवू शकतात. म्हणून ते आपल्या दृष्टीने दीर्घ काळ आवश्यक वाटल्यास पाण्यात बुडून राहू शकतात.
 असे त्यांना बाचावा साठी वा शिकार साधण्यास करावे लागते.

व मध्येच फक्त नाक पाण्या बाहेर काढून श्वास घेतात.

आपल्या फुफुसांची हवा साठवण्या ची क्षमता फारच मर्यादित असल्याने आपण एखादा मिनिट (खटपट करून) पाण्या खाली राहू शकतो. अर्थात सराव केला तर फूफुसांची क्षमता काही टक्के वाढते इतेकच.

थोडक्यात निसर्गाने ज्या प्राण्यांची प्राण वायूची गरज मर्यादित आहे (त्यांच्या शारीरिक आकार मानाच्या) तुलनेत अशा प्राण्यानाच कल्ले बहाल केले आहेत म्हणून ते पाण्यातील विरघळलेला प्राणवायू वापरू शकतात.
हत्ती ला सुद्धा जास्त TIDAL VOLUME ची देणगी आहेच शिवाय तो स्वतः पाण्यात राहून फक्त सोंड बाहेर ठेवतो व श्वास घेत राहतो. अर्थात तो पाण्यात राहणारा प्राणी नाही.

No comments:

Post a Comment