Friday, 14 April 2023

बाबा मी पोलीस भरतीत पहिली आले....वडिलांचे ऑक्सिजन लेवल 91 वरून 100 आली.

बाबा मी पोलीस भरतीत पहिली आले....
वडिलांचे ऑक्सिजन लेवल 91 वरून 100 झाली.
अत्यंत जिवाभावाची व्यक्ती घट्ट काळजाची बिलगली होती स्पर्शाची चाहूल त्यांनीही मिटल्या पापणीने जाणली होती. कुशीत शिरताच निवडली होती बेदरलेली हळवी ती चाहूल बापाच्या कुशीत विसावली होती.
बाबा मी पोलीस भरतीत पहिली आली आहे हे वाक्य आयसीय उपचार घेत असलेल्या वडिलांच्या कानावर पडतात क्षणार्धात त्यांची ऑक्सिजन देवल 91 वरून शंभर वर पोहोचली.
हा चमत्कार पाहून रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी व उपस्थित नातेवाईक देखील स्तब्ध झाले.
 हे भावनिक दृश्य पुणे येथील पंडित दीनदयाळ रुग्णालयात अनुभवला प्रणिता कुमावत वय 36 शिक्षण बीकॉम राहणार खडकवासला असे त्या मुलीचे नाव आहे.
कुम्मावत परिवार हे तसे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे गावकर त्यांचे नावाला इंदिरा आवास योजनेतील एक छोटेसे जुने घर आहे.
 काहीतरी चांगले करून दाखवण्याचे इच्छेने वडिलांनी लहानपणी गाव सोडले सध्या हे पुण्यात वन रूम किचनमध्ये राहतात त्यांच्या परिवारात आई-वडील एक मोठा भाऊ व वहिनी असे सदस्य आहेत.
वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय असून त्यांचा त्यावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात.
 प्रणिताने पोलीस व्हावी अशी वडिलांची तीव्र इच्छा मात्र घरातील इतर सदस्यांचा त्याला विरोध होता तो जगावरून वडिलांच्या इच्छे खातिर तिने 2018 मध्ये छत्रपती संभाजी नगर मधील एका करिअर अकॅडमी प्रवेश घेतला.
 अवघ्या सहा महिन्यात प्रणिता आसाम रायफल ची परीक्षा उत्तीर्ण झाली परंतु कागदपत्रे कमी असल्याने अपयश आले त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात दुसऱ्या परीक्षा यशापर्यंत पोहोचणार तोपर्यंत कोरोनामुळे पुन्हा एकदा अपयश आले धुळ्यातील पोलीस भरतीत अवघ्या एक मार्काने नशिबाने हुलकावणी दिले डिप्रेशन मध्ये आल्याने घरी परतली वडिलांची पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास दाखवला एका वर्षानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतला.
 त्यावेळी अकॅडमीची संचालक सोनवणे यांनी प्रणिताला हिम्मत दिली.
 त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात सोलापूर येथील पोलीस भरतीच्या जागा निघाल्या त्यात मैदानी चाचणीत यश संपादन केले ही आनंदाची बातमी घेऊन आली.
मात्र अचानक 13 फेब्रुवारीला वडिलांना पॅरालिसिसचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले दोन महिने उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले.
मात्र तब्येत पुन्हा बिघडली 19 मार्चला त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले तिचे वडिलांची सेवा करतच प्रणिताचा अभ्यास सुरू होता.
मात्र अचानक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा तब्येत खालावली आणि त्यांना ICU भरती करण्यात आले.

No comments:

Post a Comment