शाळेतील वर्ग वाढीसाठी लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय विभागाच्या पथकाने दोघांनाही कार्यालयातच रंगेहात अटक केली.
लिपिक सुनील महादेव ढोले व शिक्षक पवन ईश्वर झाडे अशा आरोपींची नावे आहेत.
या कारवाईमुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात खळबळ उडाली असून तेथील कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
चंद्रपूर येथील पोदार स्कूलच्या शाळेचे प्रतिनिधी असलेल्या एका व्यक्तीने शाळेतील वर्ग वाढीसाठी प्रस्ताव पाठविला होता वर्ग सहावी ते दहावीपर्यंत वर्ग वाढ करण्याबाबतचा संबंधित प्रस्ताव होता व तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
या प्रस्तावावर शिफारस करण्यासाठी लिपिक ढोले यांनी तक्रारदाराला 50 हजार रुपयांची लाच मागितली लाच ठरले.
व त्याच्या वतीने पवन झाडे हा पैसे घेईल असे ठरले.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसबीएच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली
प्राथमिक चौकशी केल्यानंतर एसबीच्या पथकाने सापळा रचला व आरोपीला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले त्याची झाडाझडती घेण्यात आली.
असता त्याने वरिष्ठ लिपिकाचे नाव सांगितले sb च्या पथकाने दोघांना विरोधातही गुन्हा नोंदविला आहे.
लोकमत
No comments:
Post a Comment