प्ले ग्रुप मधील शिक्षिका मुलांना धरून आपटायच्या पालकांच्या तक्रारीनंतर दोघींवर गुन्हा
कांदिवली पश्चिम च्या रॅम्स अँड रंबल या प्ले ग्रुप मध्ये लहानग्यांना मारहाण करणे,उचलून आपटणे,हाताला धरून फडफडत नेणे चिमटे काढणे आणि डोक्यावर मारणे असे विकृत प्रकार शिक्षकांकडून सुरू होते.
घटनास्थळाचे सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी दोन शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना नोटीस बजावण्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांदिवली पश्चिम ला राहणाऱ्या एका पालकांनी त्याचा दोन वर्षांचा मुलगा नमन यास कांदिवली पश्चिमच्या एमजी रोडवरील रायम्स अँड रंबल या ग्रुप मध्ये टाकले जीमेल शेडा मेघना जोशी आणि विराज उपाध्ये यांनी सप्टेंबर 2022 मध्ये हा प्ले ग्रुप सुरू केला होता जिथे आरोपी आणि तिची सहशिक्षिका काम करत होत्या. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार
नमन सप्टेंबर पासून प्ले ग्रुप मध्ये जातो मात्र काही दिवसापासून तू फार चिडचिडा झाला होता.
आणि घरातील लोकांना मारण्यासाठी धावायचा.
त्यामुळे तक्रारदार चिंतित होते आणि त्यांनीही काळजी अन्य पालकांकडे बोलून दाखवली तेव्हा त्यांच्याही मुलांच्या स्वभावात असा फरक पडल्याची त्यांनी तक्रारदाराला सांगितले तेव्हा तक्रारदाराने प्ले ग्रुपचे संचालक जोशी आणि उपाध्ये यांना माहिती दिली तेव्हा वर्गातील एखादा मुलगा चुकीची ऍक्टिव्हिटी करत असावा त्यामुळे मुली अशी वागतात असे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज पाहून बसला धक्का----
1) वर्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा शिक्षकांची कृती पाहून पालकांना धक्काच बसला.
2) 1 जानेवारी 2023 रोजी ते 27 मार्च 2023 या तीन महिन्यांच्या फुटेज मध्ये शिक्षिका जीनल आणि भक्ती या मुलांना मारहाण करत असताना दिसल्या.
3) इतकेच नव्हे तर मुलांना त्या हाताला धरून फडफडत न्यायच्या गालावर चिमटे काढायच्या त्यांच्या डोक्यात पुस्तक मारायच्या त्यांना उचलून बाजूला आपटायच्या या प्ले ग्रुप मध्ये 28 मुलींनी प्रवेश घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींना पोलिसांकडून नोटीस--
कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही शिक्षकांच्या विरोधात बाल न्याय अधिनियम 2000 चे कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment