परीक्षा आदल्या दिवशीच परीक्षा झाली विद्यार्थ्यांची उडाली भांबेरी--
मंगळवारी म्हणजेच 4 एप्रिल रोजी महावीर जयंती निमित्त विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेले.
पण पेपर आदल्या दिवशीच झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांची पुरती भांबेरी उडाली.
त्यांच्या पायाखाली ची वाळूच सरकली
इतका अभ्यास करूनही पेपर बुडाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षा सुरु असून ऐनवेळी परीक्षा केंद्रात बदल सुट्टीच्या दिवशी परीक्षात असलेले वेळापत्रक मिळणे,सहाव्या सत्राच्या आधी पाचव्या सत्राचा निकाल जाहीर न होणे अशा प्रकार आणि विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षांचे संकेतस्थळावर हॉल तिकीट महिनाभरापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी हे हॉल तिकीट डाउनलोड करून परीक्षेची तयारी सुरू केली.
मात्र या दरम्यान आयडॉल कडून सुधारित हॉल तिकीट संकेतस्थळावर टाकले या संदर्भात संदेशही त्यांच्या मोबाईलवर आयडॉल कडून पाठविण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
मात्र अनेकांना सुधारित हॉल तिकीट मिळालेच नाही आणि सुधारित हॉल तिकीट नुसार मंगळवारचा पेपर हा सोमवारी घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. दरम्यान आयडॉलच्या जुन्या आणि सुधारित हॉल तिकीट मुळे हा गोंधळ समोर आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले
विद्यापीठाचे म्हणणे काय?
तृतीय वर्ष बीकॉम सत्र सहाच्या परीक्षेचे हॉल तिकीट महाविद्यालयाचे लॉगिन मध्ये पाठवले होते.
1 एप्रिल 2023 रोजी काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे विनंतीनुसार परीक्षा केंद्र बदलण्यात आले त्यानुसार विद्यार्थ्यांचे सुधारित हॉल तिकीट महाविद्यालयाच्या लॉगिन मध्ये देण्यात आले होते.
परंतु काही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सुधारित हॉल तिकीट न दिल्याने विद्यार्थी त्यांच्या जुन्या हॉल तिकीट नुसार परीक्षा केंद्रावर पोहोचले त्यानंतर या परीक्षा केंद्रात विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्यानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या जे विद्यार्थी उशिरा पोहोचले त्यांना वेळ वाढवून देण्यात आली सदर विद्यार्थ्यांना सुधारित हॉल तिकीट मिळाले असून उद्यापासून ते त्यांच्या सुधारित परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील तसे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment